
पारध येथील प्रगतशील शेतकरी श्रीराम लोखंडे यांचे निधन
पारध (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी श्रीराम भगवान लोखंडे (वय ८५ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने मंगळवार, २३ डिसेंबर रोजी दुपारी ४:२५ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने पारध परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोठा कौटुंबिक विस्तार
श्रीराम लोखंडे यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. ते माजी तंटामुक्ती अध्यक्ष समाधान पाटील लोखंडे यांचे वडील असून, रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रभाकर सोनूने यांचे सासरे होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळख निर्माण केली होती.
पारध येथील स्थानिक स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
लोखंडे यांच्या पार्थिवावर बुधवार, २४ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता पारध येथील स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने लोखंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरातील नागरिक आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.



