आपला जिल्हासामाजिक
नातेवाईकांकडून अंत्यविधीच्या नावाखाली पैशाची लुटमार ; प्रशासनाची कडक कारवाई न करता फक्त बदली.. सविस्तर बातमी पहा..
येरवड्यातील धक्कादायक प्रकार! अंत्यविधीसाठी उकळले जातायेत पैसे..
पुणे : येरवडा अमरधाम हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.
अस्थिरूममध्ये अस्थी ठेवण्यासाठी हजार ते दोन हजार रुपये वसूल केले जात असल्याचे आढळून आले असून, नुकत्याच झालेल्या एका अंत्यविधीसाठी मयताच्या नातेवाईकांकडून तब्बल २२ हजार रुपये उकळल्याची माहिती पुढे आले आहे. येरवडाच्या स्मशानभूमीत दोन कंत्राटी कर्मचारी कार्यरत असून त्यांचा कारभाराचा प्रशासनाला थांग पत्ता नाही. ही कंत्राटी कामगार अमरधाम स्मशानभूमीत येणाऱ्या मयतांच्या नातेवाइकांना गिराईक म्हणून पाहतात. नातेवाईकांकडून अंत्यविधीच्या नावाखाली पैशाची लुटमार करतात.
विद्युतवाहिनीसाठीही पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यासोबत लाकूड, गोवऱ्या, डिझेलवाहिनीसाठी डिझेल या वस्तू घेण्याच्या नावावर पैसे घेऊन तेथे अंत्यविधी करू देतात. मयताचे नातेवाईक दुखवट्यामुळे मागेल ते गुपचूप देतात. याचा गैरफायदा घेत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
अंत्यविधीला सहा ते सात मन लाकूड लागते. मयताच्या नातेवाइकांकडून नऊ मन लाकडाचे पैसे घ्यायचे आणि सहा मन लाकूड आणून तीन मनाचे पैसे परस्पर खिशात घालायचे हा प्रकार सातत्याने याठिकाणी होतो.
कमिशन न दिल्याने वखारीला कुलुप
येरवड्यातील ज्या वखारीतून ह्या कमिशनखोर व्यक्ती लाकूड आणायचा त्या वखारी मालकाने कमिशन देणे बंद केल्याने त्या वखारीला अखेर कुलूप लावावे लागले, असेही एका स्थानिकाने सांगितले.
कसा प्रकार उघड झाला!
याबाबत अधिक माहिती प्राप्त झाली ती अशी, गणेश देवरे (४३, रा. अमरधाम स्मशानभूमी, गुंजन चौक, येरवडा) आणि धीरज गोगावले (२५, रामनगर, येरवडा) या दोन व्यक्तींमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला. त्यात एकाने ‘मी कधी तुझ्या पोटावर पाय दिला काय?’ अशा स्वरूपात माेठमाेठ्याने सुरू झालेल्या संभाषणातून प्रकरण मारहाणीपर्यंत पाेहाेचले. त्यात गणेश देवरे ह्याच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. याबाबत पोलिस स्टेशनला तक्रार दाखल झाली. त्यांच्या या भानगडीत मयतांच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार उघडकीस आला. यावर प्रशासन काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लक्ष लागून राहिले आहे.
अमरधाम स्मशानभूमीमध्ये कुठल्याही विधीसाठी पैसे घेतले जात नाहीत, असा फलक लावलेला आहे. पैसे मागितल्यास तक्रार करावी, असा स्पष्ट उल्लेख असताना निर्ढावलेले कर्मचारी मयतांच्या नातेवाइकांकडून पैशाची मागणी कसे काय करू शकतात. असा हा लुटीचा धंदा प्रशासनाने त्वरित बंद करावा. व कंत्राटी कामगारांवर कडक कारवाई करावी. असे स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
संजय भोसले (माजी नगरसेवक)
अंत्यविधीच्या नावावर पैसे उकळणे ही बाब अत्यंत निंदनीय आहे. आम्ही अमरधाम येथे फलक लावूनही पैशाची मागणी होत होती. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर कर्मचारी गणेश देवरे यास हाकलून दिले. ठेकेदार पोटे यांना सांगितले तर त्यांनी त्याची बदली केली.
चंद्रकांत पोटे, स्मशानभूमी कंत्राटदार मनपा, पुणे
अमरधाम स्मशानभूमी येथील कळलेला प्रकार निंदनीय असून, गणेश देवरे ह्या कंत्राटी कर्मचाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. चौकशीअंती कुणी दोषी आढळल्यास बडतर्फ करण्यात येईल.
एक दु:खी नागरिक
अस्थी काढण्यासाठी, अस्थिकोठीमध्ये दहा दिवस अस्थी ठेवण्यासाठी दोन हजार, पुजाऱ्यासाठी कमिशन, न्हावी पाहिजेत मग त्यातही कमिशन, अंत्यविधीनंतरचे सोपस्कार पार पाडण्यासाठीही यांचेच चांडाळ चौकडी हजर असतात. ज्या अंत्यविधीच्या कार्यासाठी सहा-आठ हजार खर्च येऊ शकताे, तिथे नागरिकांकडून वीस-बावीस हजार रुपये आम्हाला माेजावे लागतात. हा प्रकार म्हणजे मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचाच प्रकार सध्या येरवडा अमरधाम स्मशानभूमीत घडत आहे.
पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
“द पाॅईंट न्युज 24” https://d9news.in/
फेसबुक https://www.facebook.com/da.pae.inta.n.yuja?mibextid=ZbWKwL
ट्वीटर – https://x.com/sunilthorat24?t=iUpW9RR9Ws_jmyGpaLijEQ&s=08
इन्स्टाग्राम https://www.instagram.com
डेली हंट https://profile.dailyhunt.in/sunil24
वाॅटसअप ग्रुपला अॅड होण्यासाठी
https://chat.whatsapp.com/I0myiS3d1MdAeEEQOkbyRj वर क्लिक करून ग्रुपला जाॅईन व्हा.