गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचा समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प…
अमळनेर-(प्रतिनिधी) अमळनेर येथे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे नोव्हेंबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला लसीकरण मोहिमेच्या तालुकास्तरीय टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली असून ही बैठक अमळनेर उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी गोवर रुबेलाचे समूळ उच्चाटन करण्याचा संकल्प करून नियोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर ९ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या बालकांना गोवर व रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. यासंदर्भात प्रशिक्षण गंगाराम सखाराम (जी.एस.) हायस्कूल मध्ये घेण्यात आले या वयाची बालके बहुतेक शालेय विद्यार्थी, अंगणवाडी बालके असल्याने प्रामुख्याने शाळांना सहभागी करून मोहीम यशस्वी करण्यासाठी तालुकास्तरीय टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीत अमळनेर उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील,गटविकास अधिकारी संदीप वायाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी एन.जि.राऊत,मुख्याधिकारी शोभा बाविस्कर,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश के.ताळे, शिक्षक व पत्रकार प्रतिनिधी संजय पाटील,गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, न.पा.वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास महाजन,डॉ आशिष पाटील, समिती सचिव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.एस. पोटोडे, महावितरण चे एस.वाय.साळुंखे, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर,आर.एस.पाटील यांचा समावेश आहे.
बैठकीच्यावेळी कुपोषित बालकांच्या विषयावर ही चर्चा करण्यात आली कुपोषणाचे प्रमाण ०.४% असल्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी एन.जि.राऊत यांनी सांगून हे प्रमाण शून्यावर आणले जाईल असे सांगीतले आणि रुबेला व गोवर मोहीम १००% यशस्वी करण्यासाठी गणेश मंडळे,शाळा,समाजसेवी संस्था यांचा वापर करून पालक व विद्यार्थ्यांची जनजागृती करा,लसीकरण न केल्यास होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती सर्वांपर्यंत पोहचविण्याचे आवाहन ही डॉ.पोटोडे यांनी केले.