अमळनेर तालुका दुष्काळ जाहीर करावा शिवसेनेची मागणी..
अमळनेर – अमळनेर तालुक्यात ह्या वर्षीही कमी पाऊस झाल्याने शासनाने मागीलवर्षी प्रमाणेच आणेवरी कमी लावून तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अश्या मागणीचे निवेदन शिवसेना अमळनेरच्या शिष्टमंडळाने आज प्रांताधिकारी श्री संजय गायकवाड यांना दिले, व तालुक्यांतील प्रत्येक गांवातील सरपंचांनी २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आपल्या गांवात आणेवारी कमी करण्याचा ठराव करून तो मा.तहसिलदार अमळनेर,किंवा शिवसेना अमळनेर कडे द्यावा असें आवाहन शिवसेने तर्फे करणेत आले आहे.
आज तालुक्यात आणेवारी कमी करून दुष्काळ जाहीर करणेसाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे व तालुकाप्रमुख विजय पाटील यांचे नेतृत्वात शिष्टमंडळ नेऊन प्रांतसाहेबांना निवेदन देऊन तालुक्यात तुमच्या सर्वेक्षणानुसार कमी पाऊस होऊन पिकांची परिस्थिती नाजूक आहे व अनेक गांवात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरु आहेत, ह्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, व नुक तेच अमळनेर तालुक्यात ५५% आणेवारी असल्याचे वृत्त पत्रातून निर्दशनात आले आहे. तरी ती कमी करून दुष्काळ जाहीर करावा अशी आग्रही मागणी शिवसेनेचे वतीने निवेदनद्वारे केली आहे.
सदर निवेदन देते वेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ.राजेंद्र पिंगळे, तालुकाप्रमुख विजू मास्तर, शहरप्रमुख प्रताप शिंपी, नगरसेवक संजय पाटील माजी उपजिल्हाप्रमुख, नाना ठाकूर व देवेन्द्र देशमुख, उपतालुकाप्रमुख किशोर पाटील, चंद्रशेखर पाटील, उपशहरप्रमुख जीवन पवार, विभाएगप्रमुख अनिल बोरसे, शहरसंघटक चंद्रशेखर भावसार, एस टी कामगार सेनेचे किरण सोनवणे,रविंद्र पाटील,युवासेना, किरण शिंपी,इश्वर पाटील,भूषण पाटील,अनिल महाले, सुभाष पाटील,गणेश देवरे, प्रकाश पाटील, दिलीप पाटील,अनिल पाटील, गणेश पाटील, गौरव बोरसे,सह अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते,तसेच प्रत्येक गावातून येणाऱ्या २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत आणेवारी कमी करण्याचा ठराव करण्याचे आवाहनही करणेत आले.