पारध बु. उर्दु शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान निकाल; 90% विद्यार्थी उत्तीर्ण
By तेजराव दांडगे

पारध बु. उर्दु शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेत देदीप्यमान निकाल; 90% विद्यार्थी उत्तीर्ण
पारध, दि. 26: भोकरदन तालुक्यातील पारध बु येथील जिल्हा परिषद उर्दु शाळेने शिष्यवृत्ती परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केले आहे. केंद्र पिपळगांव रेणुकाई अंतर्गत येणाऱ्या या शाळेतील इयत्ता पाचवीच्या एकूण नऊ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीची परीक्षा दिली होती, त्यापैकी तब्बल आठ विद्यार्थी दैदीप्यमान यश मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. शाळेचा या परीक्षेतील निकाल 90% लागला असून, या नेत्रदीपक कामगिरीमुळे शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या शिष्यवृत्ती परीक्षेत शेख उमामा खलील या विद्यार्थिनीने 71% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला, तर अश्मिरा शेख एजाज 70% गुणांसह द्वितीय आणि अलिजा शेख जमदार 62% गुणांसह तृतीय क्रमांकावर राहिली. याशिवाय, शेख जिकरा रियाजुद्दीन आणि सय्यद उमामा इमरान यांनी प्रत्येकी 60%, शेख माहीन सलीम याने 59%, शिफा खान नासेरखान हिने 52% आणि शेख अंजुम जमील हिने 46% गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व पात्र विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन होत आहे. जिल्हा परिषद उर्दु शाळेचे मुख्याध्यापक जाकीर रवान, वर्गशिक्षक सोहेल अहेमद, सदाकत सर, अनीस सर आणि हिना मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे मनोभावे मार्गदर्शन केले. तसेच, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख सलीम मोईन, उपाध्यक्ष शेख अकिल मोहम्मद आणि सर्व सन्माननीय सदस्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी सतत प्रोत्साहन दिले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी श्री शहागडकर, शिक्षक संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष अजहर खॉ पठाण, उपसरपंच शेखर श्रीवास्तव, श्री युनुस, श्री जुबेर, श्री सादिक, श्री रफीक, श्री अजीम आणि पारध येथील मुस्लिम समाजाचे ज्येष्ठ नेते नासेर खान कैसरखान पठाण, नदीम पठाण, समी पठाण यांसह अनेक मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.
या यशानंतर शाळेमध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने गावकरी आणि विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. या निकालामुळे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.