Breaking
अमळनेर कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री अनिल अंबर पाटील यांचे विरुद्ध अपात्र चा प्रस्ताव दाखल…

अमळनेर – अमळनेर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्री अनिल अंबर पाटील हे ग्रामपंचायत मतदार संघातून निवडून आले होते.
परंतु नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत मंगरूळ च्या निवडणुकीत अनिल अंबर पाटील हे पराभूत झाले आहेत,या मुद्द्यांवरून श्री उदय नंदकिशोर पाटील यांनी म.उपनिबंधक जळगाव यांचे कडे आज रोजी अपात्रता प्रस्ताव महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम 1963 चे कलम 15-1 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. अर्जदार श्री उदय नंदकिशोर पाटील यांचे तर्फे अँड.सुरेश सोनवणे अमळनेर यांनी कामकाज पाहिले. या कडे अमळनेरकरांचे लक्ष लागेल आहे.