जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा…
सुनिल थोरात (प्रतिनिधी)
पुणे (हडपसर) : मा़जरी बुद्रुक येथील जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय नन्नावरे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी जि. प. सदस्य दिलीप घुले, पुणे न.पा. सह आयुक्त नितीन उदास, पुरवठा अधिकारी चिंतामणी जाधवर, शासन नियुक्त नगरसेवक, अजित घुले, बाळासाहेब घुले, विकी माने, माजी ग्रामपंचायत सदस्य निलेश घुले, बालाजी अंकुश, प्रा. निलेश घुले, काँग्रेस पक्षाचे दिलीप शंकर तुपे, बाळासाहेब विभुते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे बाबा मोरे, शैलेंद्र बेल्हेकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुवर्णा गोरे, उद्योजक सुनील गुप्ता, अनिल घुले, लायन क्लबचे राजेश अग्रवाल, पोलिस पाटील अमोल भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांच्या स्वागतानंतर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय नन्नावरे यांनी केले. ट्रस्टच्या वतीने दिव्यांच्यासाठी ट्रस्टने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून केली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी जनाधार दिव्यांग चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्याचे भरभरून कौतुक केले व दिव्यांगांना दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या सलग चार तास चाललेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराम कांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन शैलेंद्र बेल्हेकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओंकार अंकुशे, अनिकेत लवळे, संतोष तोरणे, अभय पाटील, केतन कांबळे, रुशिकेश भैरवकर आदींनी परिश्रम घेतले.