पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शनिवारी बंदोबस्ताचा आढावा घेतला. पुणे पोलीस आयुक्यालयात आयेजित करण्यात आलेल्या बैठकीत शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त आंबेडकरी चळवळीतील अनुयायी मोठ्या संख्येने राज्याच्या वेगवेगळ्या भागातून येतात. या भागातील होणारी गर्दी, नियोजन, अभिवादन सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी ठेवण्यात येणारा बंदोबस्त, वाहतूक बदल, वाहने लावण्याची व्यवस्था, याबाबतची आढावा बैठकीत घेण्यात आला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस सहपोलीस आयुक्त डाॅ. शशिकांत महावरकर, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त अनुयायांची होणारी गर्दी विचारात घेऊन मंगळवारी (३१ डिसेंबर) दुपारपासून नगर रस्ता, सोलापूर रस्ता परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??