यवतमाळ: मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे १ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, महावितरण विभागीय कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे यांना निवेदन
एमएसईडीसीएल मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने १ फेब्रुवारी पासून मिटर रीडिंग व बिल वाटपाचे काम बंद आंदोलन करण्याची घोषणा
यवतमाळ: मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे १ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन, महावितरण विभागीय कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे यांना निवेदन
पांढरकवडा, दि. 24: एमएसईडीसीएल मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने १ फेब्रुवारी पासून मिटर रीडिंग व बिल वाटपाचे काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात संघटनेने सर्व मिटर रीडर यांच्या स्वाक्षरी सह निवेदन महावितरण पांढरकवडा विभागीय कार्यकारी अभियंता यांना २४ जानेवारी रोजी देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी मिटर च्या जागी स्मार्ट मीटर ( प्रीपेड मीटर) बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे मीटर रिडींग व वीज बिल वितरण करणाऱ्या कामगारावर बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात संघटनेने शासन व महावितरण कडे वेळोवेळी उपोषण व निवेदनांच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या मांडले आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ही शासनाने वयाच्या 60 वर्षापर्यंत कामगारांना रोजगाराची शाश्वती द्यावी. अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे यावर अद्यापही कोणतीही चर्चा सुरू करण्यात आली नाही. स्मार्ट मीटर मीटर रीडर कामगारावर बेरोजगारीची वेळ येणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना मीटर रीडर कामगार भुषण निलगिरवार, तन्वीर शेख, आदिल शेख, श्रीकांत गायकवाड, रियाज शेख, अबराहर शेख, अरशद शेख, सचिन चौधरी, संजय पाकोजवार, सिद्धांत पाकोजवर आदी उपस्थित होते.