गायरान जमिनीतून बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पारध पोलिसांनी पकडली 'मुरुम'चोरीची 'खराडी', जालना जिल्ह्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल!

गायरान जमिनीतून बेकायदेशीर मुरुम उत्खनन प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
पारध, जालना: शासनाचा परवाना (रॉयल्टी) न भरता अवैधरित्या मुरुमाची चोरी करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपीतांना पारध पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. काल, ३ जुलै २०२५ रोजी रात्री ११.२५ च्या सुमारास अवघडराव सावंगी येथील गायरान जागेत ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे पारध येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार वैभव प्रल्हाद थिगळे (वय ३२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सागर विठ्ठल चाटे (वय ३२) आणि जेसीबी चालक अमोल आनंदा खराडे (वय ३५, दोघे रा. अवघडराव सावंगी, ता. भोकरदन, जि. जालना) हे एका ट्रॅक्टरमध्ये जेसीबीच्या साहाय्याने अवैधरित्या मुरुमाची वाहतूक करत होते. त्यांनी शासनाची रॉयल्टी भरली नव्हती.
पोलिसांनी तात्काळ कारवाई करत ट्रॅक्टर आणि जेसीबीसह या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक नेमाणे करत आहेत.