खान्देशची “नववारी साडी” पोहचली बर्लिन ला..! ‘माहेरची साडी’ ने केला गिनिज रेकॉर्ड ब्रेक..!!
खान्देश -मराठी मुलगी,खान्देश कन्या क्रांति प्रमोद साळवी (शिंदे) १६ रोजी रविवारी जर्मनीच्या राजधानीत बर्लिन येथे जागतिक मॅरोथॉन मध्ये केला गिनीज विक्रम.
क्रांती साळवी ने नववारी साडी परिधान करून वेगवान मॅरोथॉन पूर्ण केली आणि खान्देशाच्या शिरपेचात मानाचा तूरा त्यांनी रोवला आहे.
४२.१९५ किलोमीटर अंतर त्यांनी ३.५७.०७ तासात पूर्ण केले. गिनीज रेकॉर्डचे प्रोजेक्ट मैनेजर लीना, व अस्साना जेनसन यांनी क्रांति ला सन्मानित केले.
यापूर्वी मुम्बई ला आय.आय.टी. मॅरोथान मध्ये त्यांनी नववारी साडी परिधान करून स्पर्धा पूर्ण केली होती. जळगाव रनर्स ग्रुपच्या अबेसेंडर्स होत्या आणि त्यांनी रेेेस शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला होता.या जागतिक मॅरोथॉन साठी क्रांति ला पूमा कम्पनीने बूट स्पॉन्सर केले होते. धुळे येथील रमणीक ब्यूटीक च्या कीर्ति शेन्द्रे,चेतना आणि रेखा यांनी खास नववारी शिवुन पाठवली होती ती “माहेरची साडी” परिधान करून “क्रांती” ने ही रेस पूर्ण करून ‘क्रांती’ केली. विशेष क्रांती साळवी ह्या खान्देशच्या धुळे जिल्ह्यातील एक लहानसे खेडेगाव सामोडे येथील माहेरवाशिण आहेत.धुळे येथील जयहिंद हायस्कुलच्या विद्यार्थिनी होत्या. धुळे येथील निवृत शिक्षक जयराम नथु शिंदे (रा.टॉगोर कॉलनी धुळे) यांच्या त्या कन्या व मुम्बई मलबार हिल येथील कॅप्टन प्रमोद साळवी यांच्या त्या पत्नी आहेत. धावपटूसाठी बर्लिन मॅरोथॉन ही रॅकॉर्ड अचिवमेंट स्पर्धा असते. जगात सहा मॅरोथॉन ह्या अतिशय उच्च पातळीच्या स्पर्धा होतात त्यातील जर्मनी ची राजधानी बर्लिन ही एक आहे. बोस्टन येथे अश्याच जागतिक मॅरोथॉन मध्ये गेल्यावर्षी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच या आधी फिलीपाइन्स,मनीला,बीजिंग येथे ही सहभाग घेतला होता.
स्पर्धा ह्या माणसाच्या आयुष्यात येत असतात त्यांना खेळ भावनेने खेळायला हव्यात. आणि जर असे झाले तर जीवनात अनेक संघर्ष येवू देत त्यातून आपण निश्चित पणे यशस्वी होवू शकतो. व आपले जीवन अधिकाधिक सुंदर करू शकतो. हाच एक संदेश मी भारतीयांसाठी देते.
खान्देश कन्या
क्रांति साळवी(शिंदे)