रक्त देऊन तिचे प्राण वाचले रक्तातील माणुसकीने जातीय सलोखा राखला
अमळनेर– तिचे हिमोग्लोबिन फक्त ३ टक्के अतिशय धोकेदायक स्थिती तिचा बाप रक्तसाठी केविलवाणा चेहरा करून फिरतोय अशातच मुस्लिम युवक आणि एक शिक्षक पत्रकार रक्त दयायला पुढे सरसावले आणि तिचा जीव वाचला .
४ रोजी संध्याकाळी स्टॅम्प वेंडर कडे रोजंदारी करणारा लक्ष्मण साळुंखे केविलवाण्या आवाजात विनंती करत अमळनेर युवा मित्र परिवाराचे मनोज शिंगाने याना शोधत माझ्या मुलीला जान्हवी ला रक्तातील हिमोग्लोबिन फक्त 3 टक्के आहे ती मरून जाईल हो तिला ए पोझीटीव्ह रक्तची गरज आहे असे सांगत होता त्याचवेळी तिथे हजर असलेले मनोज शिंगाने यांनी नावेद शेख या तरुणास विनंती केली की तू रक्तदान कर, आणखी रक्त लागणार असल्याने संजय कृष्णा पाटील या शिक्षकानेही ताबडतोब रक्तदान केले. सोशल मेडियाच्या माध्यमातून युवकांनी जात धर्म बाजूला ठेवून तरुणीचे प्राण वाचवून जातीय सलोख्याचा आदर्श दाखवला
सोशल मेडियातून जातीय भावना भडकावून दंगली घडवणाऱ्या युवकांना अमळनेर युवा मित्रपरिवारने डोळ्यात अंजन घातले आहे.
जानव्ही ला डॉ मनीषा पाटील यांच्या रुग्णालयात दाखल असून वेळीच रक्त मिळाल्याने तिची प्रकृती सुधारली असून काही मुद्रांक विक्रेत्यांनीही तिच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली रक्तदानासाठी राहुल अहिरे, गुलाम नबी, पारस धाप , मनोज ठाकरे,पंकज भावसार,राहुल कंजर,दिनेश तेवर,सनी गायकवाड, राजगुरू महाजन यांचे सहकार्य लाभले