खबरीलालची वेबसाईट हॅक…. लफडेखोर विकास अधिकाऱ्याचे बातमी प्रसिद्ध केल्याने खबरीलाल वेबसाईट केली हॅक….
खबरीलालच्या असंख्य वाचकांना लवकरच मिळणार दे-धडक-बेधडक बातम्या.अमळनेर- येथील तथाकथित विमा कंपनीच्या लंपट विकास अधिकाऱ्यांचे महिलांसोबत चे लफडे हे वृत्त खबरीलाल ने बेधडकपणे प्रसिध्द केले होते. त्यामुळे शहरात मोठी खळबळ माजली होती. सर्वत्र हेच वृत्त वाचले जात होते.त्यामुळे सदर अधिकाऱ्यांची जनमानसात बदनामी होत होती. ही बदनामी कशी टाळता येईल म्हणून हे विकासाधिकारी धडपड करत होते.
त्यामुळेच या शरीर सुखासाठी चटावलेल्या अधिकाऱ्यांनी वेब डेव्हलपर्स यांची मदत घेत “खबरीलाल” ची वेबसाईट हॅक केली. नंतर त्यातील बातमीची छेडछाड करून त्यांना हवी तशी बातमी करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आमच्या असंख्य वाचकाना,व जाहीरातदारांना हे चटपट वृत्त वाचायला मिळाले नाही. त्यामुळे आम्ही वाचकांची माफी मागतो. लवकरच ती मूळ बातमी पुन्हा एकदा आम्ही जनतेच्या सेवेत प्रस्तुत करणार आहोत. हे निश्चित.
कारण वरण, बट्ट्या, “रोडगे”, चाटून, पुसून खाणाऱ्या आणि स्वतःला लंपट ‘विद्ये’त पारंगत समजणाऱ्या “अर्जुनाचा” देखील लवकरच पर्दाफाश करणार आहोत. महिलेंचा असहायतेचा गैरफायदा घेणाऱ्यांना धडा शिकविणे हेच आमचे मूळ ध्येय आहे. संस्काराचे धडे तालुकाभर देणारा विकास अधिकारी जर संस्कृती नासविण्याचे काम करीत असेल तर त्यास माफी नाही. आम्ही त्याचे पितळ उघडे पाडणार च.
खबरीलालच्या वाचकांसमोर या तथाकथित विकास अधिकाऱ्यांचा ‘बुरखा’ लवकरच फाडला जाईल.
आमच्या पाठीशी असंख्य वाचक असल्याने आम्ही हॅक केलेल्या वेबसाईड वर विजय, सं”जय” मिळवून, माझं कुणी “शेट्ये” वाकळ करणार नाही असे म्हणणाऱ्याला देखील उघडा पाडणार आहोत.
खबरीलाल वेबसाईट कुणीही “हॅक करा किंवा क्रॅक करा” खबरीलाल ची नजर आपणावर राहिलचं आणि ‘खबरीलाल’ या नावातच सार काही आहे!
प्रत्येक क्षेत्रातील बित्तमबातमी म्हणजे आतली खबर आपणापर्यंत पोहचविणार. आपला लाडका लाल… खबरीलाल …..!
आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनेच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणाऱ्या, विविध क्षेत्रातील घडामोडींबाबत खबरीलाल कायम असेल दक्ष..!
सरकारी ,तथाकथित विमा कार्यालय पासून ते खाजगीतले धंद्या पर्यंत, सर्वसामान्यांच्या हितासाठी खबरीलाल ठेवेल लक्ष.. !
समाजातील चांगल्या वाईट घटनांचे परिणाम समाज मनावर होत असतो.
याची आम्हाला जाणिव आहे. म्हणून समाजमनाचा विचार करून पत्रकारिता करणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे.
राष्ट्रसंत तुकाराम महाराजांच्या उपदेशानुसार
“सत्य असत्याशी मन केले ग्वाही।
मानिले नाही बहुमता।”
असा निर्धारपूर्वक सत्य मांडण्याचा कृतीसंकल्प खबरीलालचा आहे.
खबरीलालच्या असंख्य वाचकांना बातमीची लिंक ओपन होत नसल्याने त्या गैर सोईबद्दल आम्हास खेद वाटतोय. लवकरच खबरीलाल पुनःश्च आपल्या सेवेत अशीच खळबळजनक बातमी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता घेऊन येईल ही आमची ग्वाही.