Jalna: साखर कारखान्यातील गन मेटल चोरी करणारा ताब्यात
By तेजराव दांडगे

Jalna: साखर कारखान्यातील गन मेटल चोरी करणारा ताब्यात
जालना, दि. 03:- जालना जिल्ह्यातील तिर्थपुरी येथील सागर सहकारी साखर कारखान्यातील स्टोअर रुममधून २२ मार्च २०२५ रोजी १,३५,४२० रुपये किंमतीचे गन मेटलचे दहा नग चोरीला गेले होते. याप्रकरणी विजय बाबासाहेब कळकटे यांनी तिर्थपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कैसर निसार शेख (वय ४७, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १,११,५८५ रुपये किंमतीचे गन मेटलचे विविध बार जप्त करण्यात आले आहेत.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंकज जाधव, योगेश उबाळे, राजेंद्र वाघ, लक्ष्मीकांत आडेप, इरशाद पटेल, देविदास भोजने, सतीश श्रीवास, सागर बाविस्कर, अंकुर धांडगे आणि कैलास चेके यांच्या पथकाने ही कारवाई केली.