फेडरेशन कडून शासकीय मूग,उडीद खरेदी कालमर्यादीत ऑनलाईन नोंदणी सुरू; शेतकऱ्यांनी त्वरित नोंदणी करून घेण्याचे आवाहन…
अमळनेर– मार्केटिंग फेडरेशन ने मूग व उडीद च्या शासकीय खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी २५ पासून सुरू केली असून शेतकऱ्यांनी नोंदणी कालमर्यादीत असल्याने त्वरित नोंदणी करून घेण्याचे आवाहन शेतकी संघ व्यवस्थापक संजय पाटील यांनी केले आहे.
शासनाने मुगाला ६९७५ ₹, तर उदीडला ५६०० ₹ भाव जाहीर केला असून पासून ९ ऑक्टोबर पर्यंत शेतकऱ्यांनी नोंद करायची असून शेतकऱ्याने आपल्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर नोंद करायची आहे नोंदणीसाठी आधारकार्ड व मूग उडीद चा पिकपेरा लावलेला सात बारा उतारा आवश्यक आहे तसेच प्रत्येक शेतकऱ्याने आपला भ्रमणध्वनी केंद्रावर नोंदवायचा असून खरेदीसाठी क्रमवार येण्याचा संदेश भ्रमणध्वनीवर दिला जाणार आहे शेतकऱ्यांनी काडी कचरा असलेला १२ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता असलेला माल किंवा सातबाऱ्यावर पीक पेरा नसलेला, क्रमाने न येता आलेला माल खरेदी केला जाणार नाही अशी माहिती व्यवस्थापक संजय पाटील यांनी दिली शेतकऱ्याच्या मालाची मोजणी इलेक्ट्रॉनिक्स काट्यावर करून त्याची काटा पट्टी पावती लगेच शेतकऱ्याला देण्यात येणार आहे मालाचा मोबदला आधार जोडलेल्या बँकेच्या खात्यात जमा केला जाणार आहे संस्थेने खरेदी केलेला माल त्याच दिवशी ऑनलाईन पोर्टल वर नोंद करणे गरजेचे आहे पोर्टल वर दिलेले क्षेत्र व उत्पादन बाबतची माहिती कृषी विभाग व महसूल विभागाकडून पडताळणी केली जाणार असल्याने बोगस खरेदीला आळा बसणार आहे.