देवगांव देवळी हायस्कूल मध्ये हिंदी दिनानिमित्त वत्कृत्व स्पर्धा.
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा ज्योतीराव फुले हायस्कूल मध्ये १४ सप्टेंबर हिंदी दिनानिमित्त वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक अरविंद सोनटक्के होते.
व्यासपीठावर मुख्याध्यापक अनिल महाजन,शिक्षक एस.के.महाजन,एच.ओ.माळी उपस्थित होते.
यावेळी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक हिंदी शिक्षक आय.आर.महाजन यांनी केले.शाळेतील तिस विदयार्थीनी हिंदी भाषेचे महत्त्व स्पष्ट केले.प्रथम अश्विनी माळी,(इयत्ता १०वी) द्वितीय माधवी सपकाळे (इयत्ता १०वी) तृतीय विरेंद्र पाटील (इयत्ता९वी) उत्तेजनार्थ खुशी डांगे (९वी)अश्विनी महाजन (८वी) यांना बक्षीसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.परीक्षक म्हणून अरविंद सोनटक्के यांनी काम पाहिले.
विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व हिंदी शिक्षक ईश्वर महाजन यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणातून शाळेचे जेष्ट शिक्षक अरविंद सोनटक्के म्हणाले कि हिंदी भाषेच्या प्रचार प्रसार झाला पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी हिंदी भाषेचे महत्त्व मोठे आहे.या भाषेने देशाची एकात्मता व अखंडता कायम ठेवली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.आर.महाजन यांनी केले तर आभार प्रर्दशन एस.के.महाजन यांनी केले.कार्यक्रम
यशस्वीतेसाठी संभाजी पाटील, गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले.