घात की अपघात; मृत्यू चे गुढ कायम…?
अमळनेर-(प्रतिनिधी)अमळनेर तालुक्यातील घटना कन्हेरे येथील दोन तरुणांचा फापोरे बु।। येथील नदी काठावरील गांव विहिरीत बुडुन मृत्यु झाल्याची घटना काल २५ रोजी दुपारी २.३० ते ३.०० वाजे दरम्यान घडली असे मयतांच्या नातेवाईकांचे म्हणणे असून याबाबत अमळनेर पोलिसात रात्री उशिरा पर्यंत अकस्मात मृत्युची नोंद करण्याचे काम सुरु होते.
याबाबत असे की समाधान जगन्नाथ पाटील वय ३० रा. कन्हेरे, सतिश विश्वास पाटील वय २४ रा.गंगापुरी ह.मु.कन्हेरे हे दोघे फापोरे बुः येथिल गावाजवळील गाव विहीरीत दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान पाण्यात पडून दोघांचा मृत्यू झाला. त्यांना अथक परिश्रमानंतर दोघांनाही सायंकाळी ५:३० वाजेच्या दरम्यान बाहेर काढण्यात आले व त्यांचे शव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन साठी आणले व रात्री उशिरा पर्यंत पोलिसात नोंद नव्हती. या घटने बाबत गावकऱ्यांच्या दबक्या धिम्या आवाजात घात अपघाताच्या बाबतीत कुजबुज सुरू होती मात्र स्पष्ट बोलायला कुणीही तयार नव्हते.