“द पॉवर ऑफ मिडिया, पत्रकारांच्या कुटुंबाची काळजी घेणारी संघटना.” – तानाजीराजे जाधव. पत्रकारांसाठी अपघात कार्ड विम्याचा शुभारंभ, सदस्यांना मिळणार मोबदला.
प्रतिनिधी, २ ऑक्टोंबर
अमरावती : देशाच्या सिमेवर ज्याप्रमाणे सैनिक देशाच्या बाहेरील शत्रूपासून आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी सतत पहारा देत असतात,त्याचप्रमाणे देशाच्या आतील शत्रूपासून लोकशाहीचे संरक्षण करण्याचे काम पत्रकार करीत असतो. तेव्हा त्याचे आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होत असते. म्हणून देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या व लोकशाहीच्या चौथ्या आधार स्तंभ म्हणून नावलौकीक मिळविणाऱ्या तळागाळातील पत्रकाराच्या कुटुंबाचे संरक्षणकरण्याचे कार्य ” द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन” करणार असल्याचे प्रतिपादनसंघटनेचे राज्य कार्याध्यक्ष मा.तानाजीराजे जाधव (सांगली) यांनी केले.
त्याचबरोबर जिल्ह्यातीलच नव्हेतर संपूर्ण राज्यातील पत्रकारांनास्वत:च्या संरक्षणासोबतच त्यांच्या कुटुंबांना कवच मिळावे, यासाठी द पॉवरऑफ मिडिया फाउंडेशनच्या पुढाकाराने संघटनेच्या सदस्यांचा मा.अव्दैत चव्हाण यांनी अव्दैत कन्सलटसीच्या माध्यमातून १ लक्ष रुपयांच्या अपघातविमा काढण्यात येणार आहे, जिल्हा कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा.किशोर आबिटकर यांच्या नावाचे पहिले अपघात विमा कार्ड
काढून संघटनेचे कार्याध्यक्ष व मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
अमरावती शहराबाहेरील प्रशस्त हॉटेल लन्डमार्क येथील भव्य सभागृहातआयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून औरंगाबाद येथील संघटनेचे संस्थापक सदस्य मा.राजूभाऊ जवंजाळ
उपस्थित होते, तसेच द पॉवर ऑफ मिडिया संघटनेचे संस्थापक सदस्य मा.संदीप बाजड (अमरावती), राज्य महिला सदस्या अनिता काळे (बाजड), जेष्ठ पत्रकार मा.गजानन देशमुख (दर्यापूर), अमरावती विभाग अध्यक्ष मा.प्रा.अजयजी
देशपांडे, विभाग सचिव व टीव्ही-९ अकोलाचे जिल्हा प्रतिनिधी मा.गणेश सोनोने, अव्दैत कन्सलटसीचे संचालक मा.अव्दैत चव्हाण, जेष्ठ पत्रकार व जिल्हा उपाध्यक्ष मा.देविदास सूर्यवंशी (मामा), जेष्ठ साहित्यिक व इंडो
पब्लिक स्कूलचे प्राचार्य मिश्रा सर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.उमेशजी लोटे, महिला जिल्हाध्यक्ष संगीता भेंडे (ढोके), यांच्यासह जिल्हा कार्यकारणीचे पदाधिकारी व सदस्य प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
अमरावती जिल्हा अध्यक्ष मा. उमेशजी लोटे यांच्या सुंदर आयोजनाव्दारे द पॉवर ऑफ मिडिया संघटनेची जिल्हा कार्यकारणी घोषित करून सर्व जिल्हा सदस्यांना तसेच तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष यांना ओळखपत्र, नियुक्तीपत्र व
पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. द पॉवर ऑफ मिडिया कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व जिल्हा सदस्यांनी आपले मनोगत उपस्थित संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केले. त्यामध्ये शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांची उपस्थिती प्रामुख्याने होती. भोजन अवकाशानंतरच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संघटनेच्या पदाधिकारी
यांनी पत्रकारांच्या समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न केला. तसेच पत्रकारांच्या समस्या व त्यांच्या कुटुंबाची सुरक्षीतता याकरिता सर्वांनी संघटीत राहून प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी केला. द पॉवर ऑफ मिडियाच्या व्यासपीठावरून अनेकांना सन्मानित करण्यात आले तर काहीची यावेळी संघटनेच्या महत्वाकांक्षी पदावर नियुक्ती सुद्धा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अनिता काळे (बाजड) तर प्रास्ताविक व्हीसिएन न्यूजचे संपादक उमेश लोटे यांनी केले.