आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
पारध व परिसरात ईद-उल-अझहा उत्साहात साजरी; चांगल्या पावसासाठी आणि देशात शांततेसाठी सामूहिक दुआ
By तेजराव दांडगे

पारध व परिसरात ईद-उल-अझहा उत्साहात साजरी; चांगल्या पावसासाठी आणि देशात शांततेसाठी सामूहिक दुआ
पारध, दि. 07 (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध आणि परिसरात आज ईद-उल-अझहा (बकरी ईद) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी पारंपरिक पद्धतीने ईदची नमाज अदा करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
आज सकाळी जुन्या ईदगाह मैदानावर सकाळी ८.०० वाजता, तर नवीन ईदगाह मैदानावर सकाळी ८.३० वाजता सामूहिक नमाज पठण करण्यात आले. जुन्या ईदगाहवर मौलाना खलील ईशाअती यांनी, तर नवीन ईदगाहवर मुफ्ती अबुसाद मौलाना यांनी नमाज अदा केली.
नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच, चांगल्या पावसासाठी आणि देशात शांतता व अमन कायम राहावे यासाठी सामूहिक दुआ (प्रार्थना) करण्यात आली. या वेळी अनेकांनी एकमेकांना आलिंगन देत शुभेच्छांची देवाणघेवाण केली, ज्यामुळे परिसरात एकोप्याचे आणि सलोख्याचे वातावरण दिसून आले.