‘चकमा’ देणे पडले महागात! न्यायालयाचे वॉरंट बजावताच फरार दोन आरोपीतांना पारध पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By तेजराव दांडगे

‘चकमा’ देणे पडले महागात! न्यायालयाचे वॉरंट बजावताच फरार दोन आरोपीतांना पारध पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पारध, दि. ३० (प्रतिनिधी):भोकरदन न्यायालयाने वारंवार समन्स (Samans) बजावूनही न्यायालयात हजर न राहता पोलिसांना वारंवार चकमा देत फरार होणाऱ्या दोन आरोपीतांना पारध पोलिसांनी अखेर जेरबंद केले आहे. न्यायपालिकेच्या आदेशाचा अवमान करणाऱ्यांविरुद्ध ही एक कडक कारवाई मानली जात आहे.
भोकरदन न्यायालयाने ज्या दोन आरोपीतांविरुद्ध त्यांच्या संबंधित गुन्ह्यांमध्ये हजर न राहिल्याने अटक वॉरंट जारी केले होते, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१) हिरालाल घुसिंगे, रा. अन्वा (ता. भोकरदन), २) आसिफ सुपडा तडवी, रा. हिसोडा हे दोन्ही आरोपी न्यायालयाच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करत होते आणि वारंवार समन्स देऊनही सुनावणीसाठी हजर होत नव्हते. त्यामुळे माननीय भोकरदन न्यायालयाने त्यांच्यावर कठोर भूमिका घेत अटकेचे आदेश दिले.
पारध पोलीस स्टेशनचे सहाय्यक संतोष माने आणि त्यांच्या पथकाने न्यायालयाच्या निर्देशानुसार तत्काळ कारवाई करत वॉरंटमधील या दोन्ही आरोपीतांचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली.
न्यायपालिकेचा दणका स्पष्ट करणारी ही कारवाई असून, अटक केलेल्या दोन्ही आरोपीतांना आता पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
न्यायालयाच्या आदेशाचा आदर न करणाऱ्या कुणालाही सोडले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.