सुनिल थोरात (वार्ताहर)
पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांच्यामार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी पदांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या न्यायिक सेवा परीक्षेमार्फत दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर व प्रथम वर्ग न्याय दंडाधिकरी (MPSC CID & JMFC) यांची निवड केली जाते. त्यातील काही दंडाधिकाऱ्यांना कालांतराने उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती मिळते. मराठा व कुणबी समाजातील होतकरु विद्यार्थ्यांना या परिक्षेच्या अभ्यासाकरिता प्रोत्साहन मिळावे यासाठी सारथी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना ११ महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा रु.१० हजार मासिक हजेरीच्या आधारे विद्यावेतन व आकस्मिक खर्च म्हणून एकवेळ रु. १२ हजार अदा करण्यात येणार आहेत. तसेच प्रशिक्षणाचे संपूर्ण शुल्क सारथी संस्थेमार्फत देण्यासंदर्भात संचालक मंडळाने निर्णय घेतला आहे. ११४ विद्यार्थी या प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत. हे प्रशिक्षण मराठवाडा मित्र मंडळ शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे, स्पेक्ट्रम अकेडमी, नाशिक व संकल्प एज्युकेशन, छत्रपती संभाजीनगर या प्रशिक्षण वर्गामार्फत राबविले जाणार आहे.
महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध पदांसाठी अर्ज करत असतात योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण घेऊन ध्येय प्राप्त करण्यासाठी “सारथी” ने उपलब्ध करुन दिलेल्या निशुल्क प्रशिक्षणाच्या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त विद्याच्यांनी लाभ घेऊन यश प्राप्त करावे असे आवाहन श्री. काकडे यांनी केले आहे. सदर प्रशिक्षण तुकडीस सारथी संस्थेचे अध्यक्ष श्री अजित निबाळकर, भा.प्र.से. (से.नि.) यांनी शुभेच्छा दिल्या असून सदर प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करण्याबाबत सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??