जालना जिल्हाताज्या घडामोडी
Jalna: दिड एकरातील डॉलरची सुडी जळून खाक, जालन्यातील कोसगावातील प्रकार
By गौतम वाघ
Jalna: दिड एकरातील डॉलरची सुडी जळून खाक, जालन्यातील कोसगावातील प्रकार
जालना, 19: जिल्ह्यात डॉलरची सुडीला आग लागली असून दिड एकरातील डॉलरची राख झाली आहे. कोसगाव शिवारात दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 7:30 ते 8:00 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. ही आग कशी लागली, कोणी लावली, का लावली? याचे कारण अजुन स्पष्ट होऊ शकले नाही. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कोसगावातील अल्पभुधारक शेतकरी गजानन पन्हाळे यांच्या शेतातील जमा करुन ठेवलेल्या डॉलरच्या सुडीला अज्ञाताने आग लावली असल्याचे नुकसान ग्रस्त शेतकरी व कोसगावातील सरपंच अशोक शिंदे यांनी d9 news शी बोलताना सांगितले आहे.