
आजच्या ठळक घडामोडी – १७ मे २०२५
मान्सूनची चाहूल! पुढील आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता.
पाकिस्तानला झटका! पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी व्यापार, पर्यटनावर भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार.
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! २५० बांगलादेशी नागरिकांना दोन दिवसांत पाठवले जाणार त्यांच्या देशात.
बीडमध्ये भीषण अपघात! मद्यधुंद कंटेनर चालकाची २० जणांना धडक, एका महिलेचा मृत्यू.
मराठा आरक्षणावर जलद सुनावणी! मुंबई उच्च न्यायालयात विशेष पूर्णपीठ स्थापन.
संजय राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची टिप्पणी! ‘बाल वाड्मय वाचण्याचं वय राहिलं नाही’ – मुख्यमंत्र्यांचा टोला.
वन विभागाला उपमुख्यमंत्र्यांचा इशारा! गायमुख रस्त्याच्या कामात दिरंगाई झाल्यास गुन्हे दाखल होणार.
मोदींच्या चरणी सेना! ‘संपूर्ण देश आणि सेना मोदींच्या चरणी नतमस्तक’ – मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे विधान.
सिंदूर ऑपरेशनचा ट्रेलर! ‘वेळ येताच पूर्ण पिक्चर दाखवू’ – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा.
पवार-फडणवीस एकाच मंचावर! वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्मा आणि शरद पवारांच्या नावे स्टँडचे उद्घाटन.
साखर उत्पादनात मोठी घट! देशातील साखर उत्पादन १८ टक्क्यांनी घटले – सहकारी साखर कारखाना महासंघाची माहिती.
जवान शहीद! पश्चिम बंगालमध्ये कर्तव्य बजावत असताना लक्ष्मण पवार शहीद; शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
राज्यात अवकाळी! अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस, तापमानात घट.
महिला क्रिकेट संघ जाहीर! इंग्लंड दौऱ्यासाठी स्नेह राणा आणि शेफाली वर्माचे पुनरागमन.
‘जारण’ चा टीझर प्रदर्शित! चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला.
आजचा सोन्याचा भाव: २२ कॅरेट – ₹ ८७,२१०/- || २४ कॅरेट – ₹ ९५,१४०/-.