जळगाव येथील आयूर्वेदीक अथर्व क्लीनिकचे डॉ.अनूपम यांची मासिक सिलीकॉन ईंडीयाने घेतली दखल.
देशातील २० डॉ.पैकी खान्देशातील एकमेव डॉ.अनूपम दंडगव्हाळ यांचा समावेश…अमळनेर( प्रतिनिधी) मधूमेह आजारातून मानवी शरीराचे खराब होणाऱ्या अवयवांना वाचविण्यासाठी जळगाव येथील आयूर्वेदीक अथर्व क्लीनिकचे डॉ अनूपम दंडगव्हाळ यांची अनोख्या ऊपचार पध्दतीची दखल आय टी क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील नामवंत मासिक सिलीकॉन ईंडीयाने घेतली असून पहिल्या पानावर प्रसिद्धी दिल्यामूळे खान्देशासाठी हि भुषणावह बाब ठरली आहे अशी माहिती डॉक्टरांच्या निमा संघटनेचे डॉ सतिष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी डॉ.अनूपम दंडगव्हाळ यांनी सांगीतले कि मधूमेह हा आजार सर्वसाधारण झाला असला तरी त्याचे दुष्परिणाम भयंकर असून मानवाचे सरासरी आयुष्य कमी होत चालले आहे व रूग्ण वाढीतील प्रमाण देखील वाढले आहे मधूमेह झालेल्या रूग्णांची रक्त तपासणी करून त्यांना गोळ्या औषधी ईन्शूलीन सारखी औषधी देवून फक्त नियंत्रित केले जाते मात्र मधूमेहामूळे त्वचा, डोळे , तळहात, तळपायाची आग, ह्रदय, किडणी अशा विविध अवयवांवर परिणाम होतात मात्र परिणाम १०वर्षात जाणवतात तो पर्यंत ते दुरूस्त होवू शकत नाही या पायरीपर्यंत असतात आणि प्रत्येक अवयवाच्या उपचारासाठी स्वतंत्र डॉक्टरांकडे जाणे वेळ पैसे आणि श्रमाचे दृष्टीने परवडणारे नसते त्यामूळे मधुमेह झालेल्या रूग्णांचे अवयव खराब होवू नये म्हणून डॉ.अनूपम दंडगव्हाळ यांनी विशेष आयूर्वेदीक ऊपचार पध्दती गेल्या ९ वर्षा पासून सुरू केली आहे.आय.टी.क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या सिलीकॉन ईंडीया या ग्रुपचे जगातील अमेरीका व भारत या दोनच देशातून प्रसिद्ध होणाऱ्या या मासिकाने मधुमेह या विषयावर विशेषांक प्रसिद्ध करायचा निर्णय घेतला त्यात माहिती प्रसिध्द करण्यासाठी भारतातील ५०० डॉक्टरांचे सर्वे करून रूग्ण, रूग्णसंख्या, ऊपचार पध्दती, आर्थीक झळ त्याचे सकारात्मक परिणाम आदिंची माहिती गोळा करत त्यातून फक्त २० निवडक डॉक्टरांची माहीती निवडली त्यात संपूर्ण भारतातील महाराष्ट्रातील सर्वाधीक ५ डॉक्टरांचा समावेश असून प्रत्येकी २ पूणे व मुंबईचे तर खान्देशातील जळगांव येथील एकमेव डॉ अनूपम दंडगव्हाळ यांचा समावेश आहे मधूमेहावर वरील ऊपचार पध्दतीची सखोल ५ पानांच्या लेखा सोबतच प्रथम पानावर डॉ.दंडगव्हाळ यांना प्रसिद्धी दिल्यामूळे जळगांवचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे हि बाब खान्देश वासींयांना भुषणावह ठरली आहे यावेळी जळगाव निमा संघटनेचे डॉ.विकास चौधरी, डॉ सतिष शिंदाडकर, डॉ त्रिपाठी ऊपस्थित होते.