मोठी बातमी: पिंपळगाव रेणुकाई येथे वाळूच्या टिप्परची बोलेरो पिकअपला धडक, महिला प्रवासी जखमी होण्याची शक्यता
देवानंद बोर्डे, पिंपळगाव रेणुकाई

पिंपळगाव रेणुकाई येथे वाळूच्या टिप्परची बोलेरो पिकअपला धडक, महिला प्रवासी जखमी होण्याची शक्यता
पिंपळगाव रेणुकाई, दि. 30: भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे आज (दि. ३०) रात्री सुमारे १० वाजता एक भीषण अपघात झाला. पीके कॉर्नर परिसरात वेगाने जाणाऱ्या एका वाळूने भरलेल्या टिप्परने पिंपळगाव रेणुकाई येथील एका बोलेरो पिकअपला जोरदार धडक दिली.
प्राप्त माहितीनुसार, या बोलेरो पिकअपमध्ये सिल्लोड येथील 13 महिला असल्याची माहिती मिळत असून या महिला पिंपळगाव रेणुकाई येथे लग्नाच्या स्वयंपाक करण्यासाठी आलेल्या असल्याची माहिती मिळत आहे. टिप्परच्या धडकेमुळे बोलेरो पिकअपचा समोरचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला असून, पिकअपमधील महिला गंभीर जखमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पिंपळगाव रेणुकाई आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूचा टिप्पर अत्यंत वेगात होता आणि त्यामुळेच हा अपघात घडला. या दुर्घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात अधिक माहिती मिळताच पुढील अपडेट देण्यात येईल.
पिंपळगाव रेणुकाई-भोकरदन मार्गावर रात्री झालेल्या त्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू, अनेक जखमी, हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल