राजर्षी शाहू महाविद्यालयात पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न; डॉ. लांब यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
By तेजराव दांडगे

राजर्षी शाहू महाविद्यालयात पदवीदान सोहळा उत्साहात संपन्न; डॉ. लांब यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
पारध, दि. 03: राजर्षी शाहू महाविद्यालय, पारध येथे पदवी प्रमाणपत्र वितरण दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. व्यंकटेश लांब उपस्थित होते.
“आकाशाला हात लावताना पाय जमिनीवर ठेवा” – यावेळी डॉ. लांब यांनी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, “कष्ट करून यश मिळवल्यानंतर विद्यार्थ्यांनी नेहमी जमिनीवर पाय रोवून ठेवावेत. महाविद्यालयातून मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर सोबत ठेवावी,” असे मार्गदर्शन केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाळगू नये – डॉ. मांटे – कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिलदरी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. सुखदेव मांटे होते. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने वाटचाल करावी, असे मत व्यक्त केले.
भव्य मिरवणूक आणि दीपप्रज्वलन कार्यक्रमाची सुरुवात – महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून कार्यक्रमस्थळापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीने झाली. त्यानंतर प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
उपस्थित मान्यवर – या सोहळ्याला अजिंठा एज्युकेशन अँड मिलिटरी इन्स्टिट्यूटचे सचिव श्री. अशोक देवरे, संस्थेच्या अध्यक्षा रेवतीताई मांटे, विज्ञान शाखेचे विभागप्रमुख प्रा. अमोल बांडगे, वाणिज्य शाखेचे प्रा. दिलीप सोनुने, कला शाखेचे प्रा. रवींद्र पानपाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन – कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. मगर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, प्रा. राजू शिंदे, प्रा. संदीप राजपूत, प्रा. रामेश्वर पाडळे, प्रा. राहुल शिरसाट, प्रा. लक्ष्मण सुसर, प्रा. डॉ. मुरलीधर जाधव, प्रा. लक्ष्मण खरात, प्रा. मंगेश लोखंडे, प्रा. दिनेश कापरे, प्रा. धनराज भोसले, प्रा. राजू धनवई, विश्वास लोखंडे, संजय तबडे, विठ्ठल बोडखे, वैभव भोरकडे, अधिकार पाटील, भागवत पानपाटील, तुकाराम लोखंडे, कृष्णा अल्हाट यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.