आपला जिल्हाजालना जिल्हामहत्वाचे
पुराच्या पाण्यात अडकलेल्या 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
By तेजराव दांडगे

पुराच्या पाण्यात अडकलेल्या 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
जालना, दि. 22 – जालना जिल्ह्यात 22 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे विरेगाव येथील 14 नागरिक पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.
आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी घटनास्थळी त्वरित भेट दिली. त्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरू केले.
अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ बचावकार्य करत पुरात अडकलेल्या सर्व 14 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आणि बचाव पथकाच्या प्रयत्नांमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व नागरिकांना सुरक्षित ठेवण्यात यश आले.