पुणे (इंदपूर) : छात्र सैनिक ऋषिकेश शिंदे याची दिल्ली येथे आर डी २६ जानेवारी २०२५ परेडसाठी निवड झाली.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेना (एन. सी. सी. ) चा विद्यार्थी ऋषिकेश शिंदे याची २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनान्निमित्त दिल्लीत राजपथ येथे होणाऱ्या प्रतिष्ठित आर डी २०२५ परेडसाठी निवड झाली.
यापूर्वी २६ जानेवारी २०२४ या साली महाविद्यालयाचा राष्ट्रीय छात्र सेनेचा विद्यार्थी रुद्रकुमार गवळी याची निवड झाली होती. राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे , उपप्राचार्य प्रा. दत्तात्रय गोळे यांनी ऋषिकेश शिंदे याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
आर डी परेड देशातील सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक मानली जाते. या परेडमध्ये देशभरातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी सहभागी होतात. या निवडीने महाविद्यालयात आणि त्याच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाला आहे.
महाविद्यालय हे नेहमीच विद्यार्थ्यांना सर्वोत्तम संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असते. छात्र सैनिक ऋषिकेश शिंदे यांची निवड ही त्यांच्या प्रयत्नांचे फलित आहे. या निवडी साठी २ महाराष्ट्र बटालीयन, पुणे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ. जीवन सरवदे आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख लेफ्टनंट दिनेश जगताप यानी मार्गदर्शन केले.
सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.
Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??