स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कायदा व सुव्यवस्था बैठक संपन्न
By तेजराव दांडगे

स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कायदा व सुव्यवस्था बैठक संपन्न
जालना, दि.29 : आगामी कालावधीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रीया पार पडणार असुन, या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत बैठक संपन्न झाली त्यावेळी श्रीमती मित्तल या बोलत होत्या. यावेळी बैठकीस पोलीस अधिक्षक अजयकुमार बसंल, प्रभारी अपर उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, येणाऱ्या कालावधीत स्वराजय संस्थेच्या निवडणूक होणार आहे. याकरीता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने जिल्ह्यात शांततेसाठी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न् उद्भवणार नाही यासाठी पूर्व नियोजन करावे. तसेच सदर कालावधीत जिल्ह्यात व्यवस्थित बंदोबस्त ठेवण्यात यावा. गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन व संभाव्य कायदा सुव्यवस्था प्रश्नांवर उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात कुठेही कोणताही अनुचित प्रकार किंवा गुन्हेगारी घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी. गुन्हेगाराविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 55, 56 व 57 अन्वये तातडीने कारवाई होण्याचे अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी समन्ववय साधुन प्रकरण दाखल झालेपासुन एक महिन्यात निकाली काढावेत. तसेच तात्काळ प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. हद्दपार इसम आदेशाचे पालन करत असल्याचे पोलीस विभागाने वेळोवेळी तपासणी करावी. प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रकरणे चालविण्याकरीता दिवस व वेळ निश्चित करुन प्रकरणे निकाली काढावीत. जेणेकरुन तातडीने प्रकरणे निकाली निघतील. गुन्हेगाराविरुध्द प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याकरीता पोलीस विभागाने आवश्यक तपासणी करुन MPDA कायद्यांतर्गत स्थानबध्द्तेकरीता प्रस्ताव सादर करावेत. भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 126, 127, 128, 129 अन्वये पोलीस विभागाकडून करण्यात प्रतिबंधात्मक कारवाई मध्ये प्रकरणपरत्वे, अंतिम बंधपत्र घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी असुन, अंतीम बंधपत्र घेणे. तसेच बंधपत्राचे पालन होत असल्याची बाब पोलीस विभागाने तपासणी करावी. यासाठी संबंधित पोलीस निरीक्षक व कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसिलदार यांनी वेळोवेळी एकत्रित बैठक आयोजीत करुन बैठकीत आढावा घ्यावा. तसेच अवैध मद्य विक्री होणार नाही याकरीता राज्य उत्पादन शुल्क विभागाने पथक स्थापन करुन सदर पथकामार्फत रात्रवेळी गस्त तसेच तपासणी करुन अवैध मद्य विक्री विरोधात कारवाई करावी. शहरातील तसेच पुर्ण जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढणार नाही, याकरीता सर्व यंत्रणामध्ये समन्वय ठेवून वेळोवेळी कारवाई करावी. सोशल मिडिया व इतर माध्यमांतून अफवा फैलवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. कायदा व सुव्येवस्थेाचे अनुषंगाने गुन्हे गाराविरुध्दि प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई होणेकरीता महसूल विभाग व पोलीस विभागात समन्वायासाठी पोलीस स्टेवशन निहाय कर्मचारी यांची नियुक्ती् करणे व त्यां चे मार्फत पाठपुरावा करुन प्रचलित कायद्यान्वीये प्रतिबंधात्मनक कारवाई पुर्ण करावी. पोलीस पाटील पदाकरीता निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून, निवड झालेल्या उमेदावारांचे पोलीस विभागाने चारित्र्य पडताळणी तात्काळ उपलब्ध करुन द्यावे. जेणेकरुन सदरील पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पुर्ण करता येईल. तसेच नागरिकांनी देखील सहकार्य करून शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी यावेळी केले.
यावेळी पोलीस अधिक्षक बंसल म्हणाले की, आगामी काळात पार पडणाऱ्या निवडणूक वेळी जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्याच्या अनुषंगाने पोलिस विभागामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच भरारी पथके, चेकपोस्ट आणि तक्रार निवारण केंद्र ठिकाणी ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार होणार नाही, तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभागामार्फत योग्य नियोजन करण्यात आले आहे.
यावेळी बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.



