Jalna: भोकरदन तालुक्यात मिटर रिडर संघटनेच्या कामगारांनी काम बंद करण्याचा दिला इशारा
By तेजराव दांडगे/कृष्णा लोखंडे
Jalna: भोकरदन तालुक्यातील मिटर रिडर संघटनेच्या कामगारांनी काम बंद करण्याचा दिला इशारा
मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेचे १ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन करण्याचे निवेदन भोकरदन येथील महावितरणचे उप कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
भोकरदन, दि. 24: एमएसईडीसीएल मिटर रीडर कंत्राटी कामगार संघटनेने १ फेब्रुवारी पासून मिटर रीडिंग व बिल वाटपाचे काम बंद आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या संदर्भात संघटनेने भोकरदन तालुक्यातील सर्व मिटर रीडर यांच्या स्वाक्षरी सह निवेदन महावितरणचे उप कार्यकारी अभियंता श्री चेचकर यांना 28 जानेवारी रोजी देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रभर फॉल्टी मिटर च्या जागी स्मार्ट मीटर ( प्रीपेड मीटर) बसवण्याचे काम सुरू आहे. यामुळे मीटर रिडींग व वीज बिल वितरण करणाऱ्या कामगारावर बेरोजगारीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या संदर्भात संघटनेने शासन व महावितरण कडे वेळोवेळी उपोषण व निवेदनांच्या माध्यमातून त्यांच्या मागण्या मांडल्या आहेत. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ही शासनाने वयाच्या 60 वर्षापर्यंत कामगारांना रोजगाराची शाश्वती द्यावी. अशी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे, यावर अद्यापही कोणतीही चर्चा सुरू करण्यात आली नाही. स्मार्ट मीटर मीटर रीडर कामगारावर बेरोजगारीची वेळ येणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन देताना मीटर रीडर कामगार राजेंद्र कुमावत, कुरेश शाह, तेजराव दांडगे, शारुख शाह, दादाराव अपार, गजानन काळे, मुकीम खान, प्रभाकर थोरात, राजेश थोरात, श्रीरंग आगलावे, एकनाथ अपार, विशाल लोखंडे, मुकीम पठाण, सुफियान शाह, अन्वर शाह, फैजान शेख, मुस्तकीम शेख, काशिफ खान, कृष्णा लोखंडे, शारुख पठाण, हरिदास किरकाडे, मनोज कोल्हे दुर्गादास लक्कस आदी उपस्थित होते.