सुरेश भोंबे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
By गोकुळ सपकाळ

सुरेश भोंबे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव सपकाळ: आडगाव (ता. भोकरदन) येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक सुरेश नामदेवराव भोंबे यांच्या सेवापूर्तीनिमित्त शाळेच्या वतीने एका शानदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. श्री. भोंबे हे ३० एप्रिल २०२५ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात तब्बल ३७ वर्षे समर्पित सेवा बजावली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी दिलीप शहागडकर, गट समन्वयक एस. बी. नेव्हारे आणि पतसंस्थेचे चेअरमन संतोष इंगळे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे, जिल्हा परिषद सदस्या सुनिता शिवाजीराव सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रमेश सपकाळ, आरोग्य अधिकारी राधाकिसन कड, सरपंच सारंगधर भोंबे, माजी उपसभापती अरुण पाटील काळे, विलासराव काळे, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे मॅनेजर रमेश भोंबे, शिवाजीराव सपकाळ आणि डॉ. शालिकराम सपकाळ यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली.
याप्रसंगी धर्मपत्नी सिंधूताई सुरेश भोंबे, सुशिला आबा दानवे, सारंगधर बोडके, पाटीलबा तांगडे, सखाराम भोंबे, डॉ. संजय भोंबे, सागर भोंबे, कौतीकराव तांगडे, शीतल कड आणि अतुल भोंबे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यात बोलताना जिल्हा परिषद सदस्या आशाताई पांडे म्हणाल्या, “सुरेश भोंबे यांनी ३७ वर्षे शिक्षण क्षेत्रात मोलाची सेवा केली आहे. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी आज उच्च पदांवर कार्यरत आहेत. भोकरदन तालुक्यात त्यांच्यासारखेच शिक्षक निर्माण होऊन उद्याचे भविष्य घडवतील, यात मला शंका नाही.”
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. बडगे, श्री. शेवाळे, श्री. सूरडकर, श्रीमंती पैठणकर, श्रीमंती चव्हाण, श्रीमंती पाटील, श्री. खडके आणि श्री. साळवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन कनिष्ठ अभियंता (म्हाडा) राहुल भोंबे यांनी केले.