अमळनेरात २८ पासून भरणार भव्य शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्र प्रदर्शन..
भव्य चित्रकला स्पर्धेचेही आयोजन,जय्यत तयारी सुरु,क्रांतिकारी शहीद वीर भगतसिंग जयंती निमित्त अमळनेरातील स्पार्क फाऊंडेशन चा उपक्रम.
अमळनेर– शहरातील स्पार्क फाऊंडेशन च्या वतीने दि २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान क्रांतिकारी शहीद वीर भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त भव्य शिवकालिन व दुर्मिळ शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्पार्क फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ,शस्त्र संग्रहक व अभ्यासक पंकज रविंद्र दुसाने (झाडीकर सराफ)यांनी दिली.सदर प्रदर्शनाची जय्यत तयारी अमळनेरात सुरु असून यासाठी अनेक कार्यकर्ते जोमाने परिश्रम घेत आहेत.तर २२ सप्टेंबर रोजी भव्य चित्रकला स्पर्धा होणार आहे.
सदरचे प्रदर्शन मराठा मंगल कार्यालयात होणार असून दि २८ रोजी उदघाटन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती मध्यप्रदेशातील इंदोर येथील संपूर्ण भारतात रेकी व माईंड पॉवर चे कोच तथा शिवकालीन अभ्यासक विठ्ठलराव गोलांडे तसेच स्थानिक आमदार,नगराध्यक्षा, माजी आमदार, नगरसेवक, जि.प. व प.स.सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांची राहील. प्रदर्शनात युद्धात वापरलेल्या तलवारीचे प्रकार,भाल्यांचे प्रकार,कुऱ्हाडीचे प्रकार,काट्यारीचे प्रकार, वाघनखे,चिलखत,बिछवा तसेच अनेक प्रकारची दुर्मिळ शस्त्रास्रे पाहण्याचा योग अमळनेर तालुक्यातील सर्व विद्यार्थी,शिवप्रेमी,इतिहास अभ्यासक,महिला वर्ग,जेष्ठ व श्रेष्ठ मंडळी आदींना येणार आहे.प्रदर्शन पाहण्याची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत राहणार आहे.विशेष म्हणजे हे प्रदर्शन विनामूल्य असेल.अमळनेर शहरातील सराफ बाजारातील रहिवासी असलेले पंकज दुसाने हे प्रसिद्ध शस्त्र संग्रहक व अभ्यासक असून लहान पानापासून त्यांना हि आवड असल्याने अतिशय मोठा संग्रह त्यांनी निर्माण केला आहे,आतापर्यंत अनेक मोठ्या शहरात त्यांनी शस्त्र प्रदर्शन भरवून नावलौकिक मिळविले आहे,व आता प्रथमच आपल्या अमळनेर तालुक्यातील विद्यार्थी, शिवप्रेमी व इतिहास प्रेमींसाठी तीन दिवस प्रदर्शन आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून यासाठी शहिद वीर भगतसिग जयंतीचे निमित्त त्यांनी साधले आहे.त्यांनी स्थापन केलेल्या स्पार्क फाऊंडेशन च्या माध्यमातून हे प्रदर्शन व चित्रकला स्पर्धा होणार आहे.
शिवकालीन इतिहास विषयावर होणार चित्रकला स्पर्धा
स्पार्क फाऊंडेशन च्या वतीने दि २२ सप्टेंबर रोजी शिवकालीन इतिहास या विषयावर मराठा मंगल कार्यालयात चित्रकला स्पर्धा होणार आहे,इयत्ता ४ ते ७ पहिला गट,८ ते १० दुसरा गट आणि तिसरा गट सर्वांसाठी खुला अश्या तीन गटात हि स्पर्धा होणार असून या स्पर्धेतून १२ विजेते काढण्यात येणार आहे.सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र तर विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धेसाठी नाव नोंदणीची अंतिम मुदत दि २१ सप्टेंबर पर्यंत असून स्पर्धकांनी आपली नावे
झाडीकर सराफ,सराफ बाजार मोबा ९२६०२१३००२,
राजेंद्र नाईक ८३९०५९४९९५,स्टेशन रोड,
आर.डी.चौधरी ९४२२६१८३९३ आणि
सचिन साळुंखे ७०२०३९०९९७
यांच्याकडे नोंदवायची आहेत.
विशेष म्हणजे ही स्पर्धा सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.
तरी सर्वांनी या शास्त्रास्र प्रदर्शन व चित्रकला स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन स्पार्क फाऊंडेशन चे अध्यक्ष पंकज दुसाने, उपाध्यक्ष डॉ हर्षल दाभाडे ,सचिव प्रशांत जगदाळे,कोषाध्यक्ष सौ निशा दुसाने,सौ प्रतिभा पाटील,कुणाल सोनार,विजेंद्र शिरसाळे, स्वर्णदीप राजपूत व कार्यकर्त्यानी केले आहे.
सहकार्य समृध्द माती फाऊंडेशन सचिव जिल्हा महिला पतंजली प्रभारी सौ. प्रतिभा पाटील,खा.शी. विस्वस्त सौ.वसुंधरा लांडगे करीत आहेत.