भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी! जालना येथे मोफत पूर्व प्रशिक्षण
By तेजराव दांडगे

भारतीय सशस्त्र दलात अधिकारी होण्याची संधी! जालना येथे मोफत पूर्व प्रशिक्षण
जालना, दि. 16: भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या जालना जिल्ह्यातील तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे Combined Defence Service (CDS) परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी CDS कोर्स क्र. 65 आयोजित करण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण, निवास आणि भोजन पूर्णपणे निःशुल्क असेल.
जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे दिनांक 5 जून 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत मुलाखतीसाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) या संस्थेच्या वेबसाइटला भेट देऊन CDS कोर्ससाठी असलेले प्रवेशपत्र व सोबतची परिशिष्टे डाऊनलोड करून, त्याची प्रिंट घ्यावी आणि ती पूर्णपणे भरून सोबत आणावी. तसेच, ज्या उमेदवारांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रवेशपत्र आणि परिशिष्टे दिली आहेत, त्यांनी ती सोबत घेऊन यावीत.
सी.डी.एस. वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे आणि त्यासंबंधीचे प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत आणावे:
• उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.
• उमेदवाराने लोकसेवा आयोग (UPSC), नवी दिल्ली यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सी.डी.एस. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेला असावा.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांच्या ईमेल आयडी (नमूद नाही) आणि दूरध्वनी क्रमांक 0253-2451032 किंवा व्हॉट्सॲप क्रमांक 9156073306 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधू शकतात, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.