लेहा येथे श्री अंबा भवानी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
बाळू उबाळे

लेहा येथे श्री अंबा भवानी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
लेहा, दि. 04 : भोकरदन तालुक्यातील लेहा गावात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री अंबा भवानी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लेह्यातील ग्रामदैवत असलेल्या श्री अंबा भवानी मातेचा उत्सव चार दिवस चालला आणि यामुळे गावात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
बुधवारपासून ख्वाजा गरीब नवाज बाबा यांच्या संदल आणि कव्वालीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी आठ ते बारा या वेळेत माता अंबा भवानीच्या मुकुटाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत लेहा आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. महिलांनी देवी मातेचे पूजन करत दर्शन घेतले.
या उत्सवासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रात्री नऊ ते पहाटे चार वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम झाले, ज्यात संपूर्ण रामायणावर आधारित राम कथेचे सादरीकरण करण्यात आले. शनिवारी सकाळी ५ वाजता श्री अंबा भवानी मातेच्या स्वारीचे मानकरी सुरेश समकाळ यांना देवीचा पेहराव चढवण्यात आला आणि देवीच्या स्वारीसमोर नवसाची पोत खेळली गेली.
अशा प्रकारे, लेह्यातील सर्व गावकरी आणि धर्म समभावाची भावना जपत या पारंपरिक उत्सवाचा आनंद घेतला.