पारध येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव शाळेत शहीद जवानांना श्रंदाजली, एक श्याम शहीदो के नाम, कार्यक्रमाचे आयोजन तसेच आजी-माजी सैनिक, आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार
By तेजराव दांडगे
पारध येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव शाळेत शहीद जवानांना श्रंदाजली, एक श्याम शहीदो के नाम, कार्यक्रमाचे आयोजन तसेच आजी-माजी सैनिक, आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार
पारध, दि. 14:- भोकरदन तालुक्यातील पारध येथे शुक्रवार दि.१४ फेब्रुवारी या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा न करता पुलवामा येथे झालेल्या जवानांना भावपुर्ण श्रदांजली दिली तसेच पारध परीसरातील आजी माजी सैनिक, आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. हा कार्यक्रम स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल व महाविद्यालय यांनी आयोजीत केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थाध्यक्ष मनिष श्रीवास्तव तसेच पारध पोलीस स्टेशनचे ए. पी. आय. संतोष माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम एक शाम शहीदो के नाम या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात शैक्षणिक आरोग्य सामाजिक सैनिकी तसेच पोलीस क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैनिकांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.
यावेळी शैक्षणिक क्षेत्रात राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षक पुरस्कार रवींद्र लोखंडे यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच संभाजीनगर येथे कार्यरत असलेले कर्मचारी ज्ञानेश्वर क्षिरसागर यांनी काल दोन महिलांचा प्राण वाचवला होता त्याबद्दल सुद्धा त्याचा सत्कार करण्यात आला. अशा विविध आजी व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपसरपंच शेखर श्रीवास्तव, माजी मुख्याध्यापक अजहर पठाण, संस्थेचे सचिव विक्रांत श्रीवास्तव, पत्रकार रवींद्र लोखंडे, समाधान तेलंग्रे, संतोष मोकासे, रामसिंग ठाकूर, रमेश जाधव, तेजराव दांडगे, अनिल जाधव तसेच गावातील माजी सैनिक रामराव मोकाशे अनिल देशमुख समाधान राऊत, भिका बोडके, रतन राजपूत, दिनेश लोखंडे, भानदास लोखंडे, समाधान राऊत असे अनेक आजी व माजी सैनिक उपस्थित होते या कार्यक्रमाला गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.