आपला जिल्हाशिक्षण

स्कूल बस पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या रडारवर ; पोलीस, आरटीओ, शाळा प्रशासन जबाबदारी घेत नाही…

तपासणी करणार्या आरटीओ अधिकार्यांलाही जबाबदार धरावे का?

CSC मार्फत रोजगाराभिमुख कोर्सेस: प्रशिक्षण घ्या, प्रमाणपत्र मिळवा आणि करिअर घडवा! – संपर्क करा :- तेजराव दांडगे_ ९६०४०८४०६६, ७७७५९८६५९८ विविध कोर्स 1. ऑप्टिकल फायबर स्प्लायसर (OFS) कोर्स, 2) DTH सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन व सर्व्हिस टेक्निशियन, 3. CCTV इन्स्टॉलेशन टेक्निशियन कोर्स,  4. स्मार्ट मीटर असिस्टंट टेक्निशियन कोर्स, 5. उषा शिवणकाम व टेलरिंग कोर्स, डिजिटल वेलनेस कोर्स, 7. सॉफ्ट स्किल्स व व्यक्तिमत्त्व विकास कोर्स असे विविध कोर्स आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी या चालणाऱ्या पट्टी लिंक वर क्लिक करा 

सुनिल थोरात (हवेली)
पुणे : खराडी भागातील एका शाळेतील १५ ते २० विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी निघालेल्या स्कूल बसला आग लागली होती. सुदैवाने यात कोणतीही जिवीत हानी झाली नव्हती. परंतु अद्याप त्या स्कूल बसला लागलेल्या आगीचे कारण समोर आलेले नाही.
या घटनेमुळे स्कूल बस पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या रडारवर आल्या असून शहरासह उपनगर भागातील स्कूल बसची कसून तपासणी सुरू झाली आहे.
पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून सातत्याने स्कूल बसची तपासणी केली जाते. विधानसभा निवडणुकीच्या काळात ही तपासणी मोहीम थांबली होती. परंतु खराडीतील घटनेनंतर तपासणी मोहीम पुन्हा सुरु करण्यात आली आहे. पुणे आरटीओने ११ महिन्यांत एकूण दीड हजार स्कूलबसची तपासणी केली आहे. त्यावेळी ६०१ स्कूल बस दोषी आढळून आल्या. त्यांच्याकडून २१ लाख ७९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच, न्यायालायने चार स्कूल बसवर कारवाई करून त्यांच्यावर दंडही ठोठावला आहे.
दरम्यान, खराडी परिसरात आग लागलेल्या स्कूलबसची सर्व कागदपत्रे पूर्ण होती. या स्कूलबसचा फिटनेस परवाना ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. तर, पीयूसी २०२७ पर्यंतची आहे. या स्कूलबसला आग का लागली, याची तपासणी केली जात आहे. या घटनेपूर्वी देखील आरटीओकडून स्कूलबसची सतत तपासणी केली जात होती. आता आगीच्या घटनेनंतर तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यात पथकाकडून तपासणी तसेच कारवाई सुरू आहे, अशी माहिती पुणे विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी प्रसार माध्यमांनी दिली.
पालकांनी कामामुळे त्यांच्या पाल्यांना प्रत्यक्षात जावून शाळेत सोडणे शक्य होत नाही. तसेच विद्यार्थ्यांनी वेळेत शाळेत पोहचावे म्हणून स्कूल बसचा पर्याय पालकांना योग्य वाटतो. त्यामुळे स्कूल बस या सुरक्षित हव्यात, असे पालकांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी स्कूल बस धारकवर आहे. असे पालकांनी सांगितले. दरम्यान स्कूल बसला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर पालकांची काळजी वाढली आहे. स्कूल बस धारक, शाळा आणि आरटीओने पालकांना दिलासा देण्याची गरज असल्याचे मत पालकांचे आहे.
 मुकुंद किर्दत, समन्वयक, आप पालक युनियन
स्कूलबससह स्कूल व्हॅनची असुरक्षितता लक्षात घेणे आवश्यक आहे. या व्हॅनमध्ये अनेकदा घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्याचे दिसून आले आहे. या व्हॅनला फ्रंट मार्जिन कमी असते. त्यामुळे त्या सुरक्षित वाटत नाहीत. हा प्रकार गंभीर आहे. यावरुन अनेक वर्षांपासून नुसती चर्चा केली जाते. परंतु त्याची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नाही. पोलीस, आरटीओ आणि शाळा प्रशासन स्कूल बसची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे ही जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्नच आहे.
स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे विभाग
खराडीत स्कूलबसला लागलेल्या आगीच्या घटनेपूर्वीदेखील आरटीओकडून स्कूलबसची सतत तपासणी केली जात होती. या घटनेनंतर तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यात पथकाकडून तपासणी तसेच कारवाई सुरू आहे.
तपासणी करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यालाही जबाबदार धरावे…
  1. स्कूलबससह स्कूल व्हॅनची असुरक्षितता लक्षात घेणे आवश्यक आहे. या व्हॅनमध्ये अनेकदा घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केल्याचे दिसून आले आहे. या व्हॅनला फ्रंट मार्जिन कमी असते. त्यामुळे त्या सुरक्षित वाटत नाहीत. हा प्रकार गंभीर आहे. यावरुन अनेक वर्षांपासून नुसती चर्चा केली जाते. परंतु त्याची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नाही. पोलीस, आरटीओ आणि शाळा प्रशासन स्कूल बसची जबाबदारी घेत नाही. त्यामुळे ही जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न आहे. आरटीओकडून मार्च, एप्रिल महिन्यात स्कूलबस, व्हॅनची तपासणी करुन प्रमाणपत्र दिले जाते. परंतु ही तपासणी करताना कितपत नियमांचे पालन केले जाते, हे पाहणे आवश्यक आहे. त्यामुळे तपासणी आरटीओ अधिकाऱ्यालादेखील जबाबदार धरले पाहिजे. शासनाने नवीन नियमावली आणली परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. स्कूल बसबाबतची जबाबदारी निश्चित केल्याशिवाय सुरक्षितता वाढणार नाही, अशी सूचना आम आदमी पक्षाच्या पालक युनियनचे समन्वयक मुकुंद किर्दत यांनी केली.

D9 News मराठी

सूचना - (D9 news चा अर्थ म्हणजेच = दीप्ती न्यूज (Deepti News): "दीप्ती" म्हणजे प्रकाश, जो ज्ञानाचा आणि सत्याचा प्रकाश पसरवतो.) D9 news marathi च्या बातमी किंवा जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. आम्ही MDMA चे सभासद असून माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत (मध्यस्थ मार्गदर्शन तत्वे आणि डिजिटल माध्यमे) नियम 2021 चे पालन करतो. या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर, बातमी, लेख, व्हिडीओ, इ. बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास d9newscomplaint@gmail.com वर संपर्क करावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??