अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी 23 जानेवारी 2026 पर्यंत त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन
By तेजराव दांडगे
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी 23 जानेवारी 2026 पर्यंत त्रुटीची पुर्तता करण्याचे आवाहन
जालना, दि.16 : अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात.
सन 2025-26 या आर्थिक वर्षातील सदर दि. 31 मे 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जालना जिल्ह्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना कार्यालयात सन 2025-26 या आर्थिक वर्षात संबंधित बचत गटाकडून प्राप्त झालेल्या अर्जाची छानणी करण्यात आली असून प्राप्त अर्जातील काही बचत गटांचे कागदपत्रे अपुर्ण असल्याने कागदपत्राची त्रुटी पुर्तता करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना येथील सुचना फलकावर यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
तरी त्रुटीत असलेल्या बचत गटांनी दि. 23 जानेवारी 2026 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालयीन वेळेत त्रुटी पुर्तता करण्यासाठी यावे असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण अनिल सुनगत यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


