आपला जिल्हाजालना जिल्हाताज्या घडामोडी
जनता विद्यालयात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांना अभिवादन
By तेजराव दांडगे

जनता विद्यालयात अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांना अभिवादन
पारध, दि. ०१: भोकरदन तालुक्यातील पारध बु येथे आज जनता विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने दोन्ही महान व्यक्तींच्या कार्याचे स्मरण करून त्यांना आदराने अभिवादन करण्यात आले.