शेतकऱ्यांना दिलासा! आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते 48 अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना 95 लाखांचे अर्थसाहाय्य वितरित
गोकुळ सपकाळ

शेतकऱ्यांना दिलासा! आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते 48 अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना 95 लाखांचे अर्थसाहाय्य वितरित
भोकरदन/जाफ्राबाद (प्रतिनिधी): राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकरी बांधवांना अपघातामुळे येणाऱ्या संकटातून दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या “गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने” अंतर्गत भोकरदन आणि जाफ्राबाद तालुक्यातील एकूण 48 अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबांना 95 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले. गुरुवारी, 24 जुलै 2025 रोजी आमदार संतोष पाटील दानवे यांच्या हस्ते या आर्थिक साहाय्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमास जि.प. सदस्या सौ. आशाताई पांडे, जि.प. सदस्य डॉ. चंद्रकांत साबळे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष गणेश पाटील ठाले, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, गटविकास अधिकारी महेंद्र साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार संतोष पाटील दानवे यांनी, शेतकरी जीवनातील अपघातासारख्या मोठ्या संकटांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “शेतकरी कुटुंबातील कर्ता माणूस अपघाताने गमावल्याचे दुःख शब्दात मांडणे अशक्य आहे आणि शासनाची ही मदत त्याची नुकसान भरपाई होऊ शकत नाही. मात्र, अशा कठीण प्रसंगात कुटुंबाला आर्थिक आधार देणे महत्त्वाचे आहे. शासनाची ही आर्थिक मदत या कुटुंबांना पुन्हा उभे राहण्यासाठी निश्चितपणे साहाय्य करेल.”
अनुदान वाटप झालेल्या अपघातग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांची यादी:
भोकरदन तालुका:
अंजना रमेश बर्डे – फत्तेपूर
नंदाबाई विजय वाघ – जाळीचादेव
सुनंदा दिगंबर अस्वार – वाढोणा
अनिता शिवाजी कड – सिपोरा बाजार
शेख फरीद शेख नसीम – फुलेनगर
शिलाबाई गणपत साळवे – माळेगाव
कमलबाई राजाराम वैरी – धावडा
सखुबाई सिताराम सोरमारे – वाडी बु.
कौतिकराव धुरपतराव पाबळे – कोपर्डा
लक्ष्मी गुलाबराव साबळे – क्षीरसागर
रूक्मण कृष्णा तांगडे – वडोद तांगडा
रोहन अशोक नलावडे – पळसखेडा दाभाडे
अंकुश पंडित सोनवणे – एकेफळ
सुगंधाबाई सोनाजी सोनूने – कोठाकोळी
अनिता बाबासाहेब गायके – हसनाबाद
ज्योती सर्जेराव सोनवणे – एकेफळ
तुषार कैलास पुरी – वडशेद
गणपत काकाराव नावळे – एकेफळ
अलका सुरेश कुमावत – हसनाबाद
भगवान गणपत मालुसरे – तपोवन
लक्ष्मीबाई विठ्ठल शिंदे – वाडी बु.
राधाबाई हरिभाऊ रोठे – पिंपळगाव कोलते
जिजाबाई भानुदास वाडेकर – सावखेडा
रेखा गजानन काळे – शेलुद
अशोक पांडुरंग जोशी – बरंजळा साबळे
किरण तुळशीराम आढावे – नांजा
अमोल आत्माराम घायवट – मलकापूर
सविता संतोष ताम्हाणे – पिंपळगाव रेणुकाई
दिलीप साहेबराव लोखंडे – बरंजळा लोखंडे
बाबुराव शामराव गोफणे – खापरखेडा
रूक्मणबाई कृष्णा गिरणारे – कोदोली
शोभा अनिल साळवे – कुंभारी
ताराबाई संदीप रोकडे – खापरखेडा
आशा रावसाहेब गडकरी – खडकी
शारदा दिलीप सनान्से – धावडा
संजय विश्वनाथ साबळे – लिंगेवाडी
भागुबाई शिवाजी साबळे – बरंजळा साबळे
शिवनंदा शंकर पवार – खादगाव
ज्योती समाधान बनसोडे – जानेफळ दाभाडी
पोपटराव रुस्तुम बदर – वालसा खा.
जाफ्राबाद तालुका:
आसाराम रामराव भागिले – गणेशपुर
रूपाली भागवत जाधव – बोरगाव बु.
जगतसिंग देवचंद काकरवाल – गोकुळवाडी
अंजना दिलीप डोईफोडे – डोलखेडा खु.
गणेश शिवाजी देठे – येवता
अनुसया साहेबराव बोऱ्हाडे – गोंधनखेडा
श्रीकृष्ण काशिनाथ गायकवाड – सांजोळ
पार्वतीबाई विष्णू चव्हाण – धोंडखेडा