पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा – मंत्री दत्तात्रय भरणे
Recalculate the income of Dargah Sharif Shah Tajammul Shah alias Pankhewale Baba Trust - Minister Dattatreya Bharane

दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा ट्रस्टच्या मिळकतीची फेरमोजणी करा – मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. १६ : घाटकोपर येथील दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह ऊर्फ पंखेवाले बाबा अॅण्ड मस्जिद ट्रस्टच्या मिळकतीमध्ये होत असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मिळकतीची फेरमोजणी करण्याच्या सूचना अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या.
मंत्रालयात दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह अलियास पंखेवाले बाबा अँण्ड मस्जीद ट्रस्ट, घाटकोपर, मुंबई यांच्या मिळकतीमध्ये होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मंत्री श्री. भरणे बोलत होते. यावेळी अल्पसंख्याक विभागाचे सचिव रुचेश जयवंशी, उपसचिव मिलिंद शेनॉय, मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, दर्गाह शरीफ शाह तजम्मुल शाह अलियास पंखेवाले बाबा अँण्ड मस्जीद ट्रस्टचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. ेभरणे यावेळी म्हणाले की, फेरमोजणी दरम्यान दोषी आढळणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.