जनता विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
By तेजराव दांडगे

जनता विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी
पारध (प्रतिनिधी): भोकरदन तालुक्यातील पारध येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवार (दि.१२) राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सर्वप्रथम विद्यालयाच्या प्राचार्या शर्मिला शिंदे लोखंडे,जेष्ठ शिक्षक रवी लोखंडे,प्रा.संग्रामराजे देशमुख, विजया कदम यांनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा.संग्रामराजे यांनी केले तर या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेच्या विद्यार्थिनी दिपाली तेलंग्रे, प्रगती लोखंडे, आदिती बोराडे, प्रतीक्षा धनवई, भक्ती लोखंडे, तृप्ती देशमुख, मनिषा तबडे, रोहिणी तबडे, भाग्यश्री तबडे, लक्ष्मी क्षीरसाठ, लक्ष्मी ऐडे, श्रद्धा पोपळघट, ऋतुजा तबडे या विद्यार्थिनींनी जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याचा परिचय आपल्या भाषणातून करून दिला.
यावेळी आर. ए.देशमुख, प्रा.एन.एन.पाटील, मृदुला काळे, प्रा.सुनील हजारे, ए. टी.सोनूने, लता वानखेडे, प्रा.सुनील पायघन, एस.पी.बैस, एस. डी.बोर्डे, प्रीतमसिंग मोरे, विजयसिंग चंदनसे, बंकिमचंद्र लोखंडे, महेश शेळके, बजरंग बिरादार, देविदास सुरडकर, नामदेव पवार यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



