D9 News Marathi – आजच्या ठळक घडामोडी
D9 News Marathi - Today's Top Stories

D9 News Marathi – आजच्या ठळक घडामोडी
• भारतीय सैन्याची मोठी कारवाई: DGMO यांच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरमध्ये 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले. मात्र, हे ऑपरेशन अजून संपलेले नाही, असे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही भारताच्या कारवाईचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचल्याचे ठामपणे सांगितले आहे.
• मुंबईत फटाक्यांवर बंदी: मुंबई पोलिसांनी 11 मे ते 9 जूनपर्यंत महिनाभर फटाके आणि रॉकेट उडवण्यास मनाई केली आहे.
• मराठा पर्यटन ट्रेन: किल्ल्यांना जोडणारी विशेष मराठा पर्यटन ट्रेन 9 जूनपासून सुरू होणार आहे.
• सीमाभागात तणाव कायम: ऑपरेशन सिंदूरनंतर सीमाभागात शांतता असली तरी तणाव अजून कायम आहे. त्यामुळे जनतेला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
• बँकांना मोठा नफा: सरकारी आणि खासगी बँकांनी वर्षभरात 1.79 लाख कोटींचा नफा कमावला असून, त्यात 27 टक्क्यांची वाढ झाली आहे.
• चीन-पाकिस्तान मैत्री: युद्ध थांबताच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीनचे शी जिनपिंग यांचे कौतुक केले, तर चीननेही त्यांची मैत्री ‘पोलादासारखी मजबूत’ असल्याचे म्हटले आहे.
• संसदेच्या विशेष अधिवेशनाची मागणी: भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना तात्काळ संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे पत्र लिहिले आहे.
• वायुसेनेचे ऑपरेशन सुरूच: भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाली असली तरी, भारतीय वायुसेनेचे ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच आहे. वायुसेनेने नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे.
• राजकीय नेतृत्वावर टीका: संजय राऊत यांनी भारतीय सैन्याला पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी होती, पण राजकीय नेतृत्वाने कच खाल्ली, असा आरोप केला आहे.
• शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा: सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा वादळातही 100 वर्षे टिकणारा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
• राज्यात अवकाळीचा इशारा: महाराष्ट्रात पुढील 4 दिवसांत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस येण्याची शक्यता असून, काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
• बांगलादेशी क्रिकेटरची भीती: बांगलादेशचा क्रिकेटर रिशाद हुसेन पाकिस्तानातील स्फोटांमुळे घाबरून एअरपोर्टवरच ढसाढसा रडला आणि ‘दोबारा कभी नहीं जाऊंगा पाकिस्तान’ असे म्हणाला.
• गांधी हत्येवरून वाद: महात्मा गांधींची हत्या हा पहिला दहशतवादी हल्ला होता, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
• सोन्याच्या भावात मोठी घसरण: भारत-पाकिस्तान युद्ध थांबताच सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून, भाव 4 हजारांनी कमी झाले आहेत. आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव 96 हजार 710 रुपये आहे.
• SIP ची रेकॉर्डब्रेक गुंतवणूक: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये एका महिन्यात 26 हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक झाली आहे, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे.
• IPL च्या वेळापत्रकात बदल: आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. 16 मे पासून सामने सुरू होऊन अंतिम सामना 30 मे रोजी होण्याची शक्यता आहे.
• भारताची वनडे मालिकेत विजयी: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने तिरंगी वनडे मालिकेत यजमान श्रीलंकेचा पराभव करत ट्रॉफी जिंकली आहे.
• आजचे सोन्याचे भाव:
* 22 कॅरेट: ₹ 90,044/- प्रति 10 ग्रॅम
* 24 कॅरेट: ₹ 98,670/- प्रति 10 ग्रॅम