भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून महिलांसाठी लवकरच भव्य संमेलन होणार-आ.सौ स्मिताताई वाघ
अमळनेर येथे भाजपा महिला मोर्चाची बैठक उत्साहातअमळनेर-आगामी काळात जागर स्त्री शक्तीचा म्हणून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी लवकरच अमळनेर येथे भव्य संमेलन भरविण्यात येणार आहे,यात महिलांचे हक्क,महिला विषयक कायदे तसेच बचत गटात काम करणाऱ्या माहिलांसाठीच्या योजना,केंद्र व राज्य सरकारच्या योजना यांचा जागर या संमेलनात करण्यात येणार असल्याची माहिती आ सौ स्मिताताई वाघ यांनी अमळनेर येथे आयोजित भाजपा महिला मोर्चाच्या बैठकीत दिली.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची बैठक नुकतीच कृ. उ.बा. समिती अमळनेर येथे संपन्न झाली, बैठकीत बेटी बचाओ बेटी पढाओ च्या संयोजिका डॉ.अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी प्रवास करून बुथ यंत्रणेपर्यंत काम करावे,व पक्षाने दिलेले काम सक्षमपणे सांभाळावे अशी अपेक्षा व्यक्त करून बेटी बचाव बेटी पढाव अभियानाबाबत माहिती दिली. याप्रसंगी आमदार स्मिताताई वाघ पुढे बोलताना म्हणाल्या की बुथ यंत्रणा भारतीय जनता पार्टीचा कणा आहे,या यंत्रणेत महिला देखील सक्रिय असल्या पाहिजे , महिलांमध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन करण्याची जन्मजातच वृत्ती असते त्याचा उपयोग राजकारण व समाजकारणात होत असतो,प्रामाणिकपणे काम केल्यास त्याचे फळ मिळतेच अशी भावना त्यांनी व्यक्त केली. बैठकीत जि.प. सदस्य मीनाताई पाटील, सोनुताई पवार,नगरसेविका नुतन महेश पाटील,शितल राजेंद्र यादव,महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. संगीता पाटील,शहराध्यक्षा पुष्पाबाई राजपुत,ता.सरचिटणीस श्वेता पाटील,किरण पाटील,शहर चिटणीस राधिका कलोसे, आशाबाई पाटील,अनिता उलहे, गायत्री पाटील,सुनंदा पाटील, निरंजनी देशमुख, वैशाली खोंडे,माधुरी पाटील,अनिता पवार, व महिला कार्यकर्त्या पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होत्या.