कोदा येथे पारध पोलिसांची कारवाई! विना परवाना गावठी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या एकास अटक; १३ लिटर दारू जप्त!
By तेजराव दांडगे

कोदा येथे पारध पोलिसांची कारवाई! विना परवाना गावठी दारूची चोरटी विक्री करणाऱ्या एकास अटक; १३ लिटर दारू जप्त!
पारध, दि. २३: जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात कोदा येथे अवैधरित्या गावठी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध पारध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार संतोष गुलाबराव जाधव यांनी ही कारवाई केली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २२/१०/२०२५ रोजी सायंकाळी १८.५० वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी पोलीस अंमलदार संतोष गुलाबराव जाधव (बक्कल नं. ८५३) यांच्या घरासमोर, मौजे कोदा येथे आरोपीत भिवसन अर्जुन जाधव (वय ३५ वर्ष, रा. कोदा, ता. भोकरदन, जि. जालना) हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या गावठी हातभट्टीची दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ती ताब्यात बाळगताना मिळून आला.
जप्त केलेला माल:
पोलिसांनी आरोपीताकडून ₹ १३००/- किंमतीची १३ लिटर आंबट व उग्रट वास येत असलेली गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.
गुन्हा दाखल: सपोनि संतोष माने यांच्या आदेशाने आरोपीताविरुद्ध गु.र.नं. २६६/२०२५, कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पो.ह.काँ. एस.सी. खिल्लारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. गुन्हा पो.हे.काँ. एस.बी. जावळे यांनी दाखल केला आहे.



