राजर्षी शाहू विद्यालयाचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र!
By तेजराव दांडगे

राजर्षी शाहू विद्यालयाचे दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र!
पारध (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे, पुणे यांच्यामार्फत नुकत्याच झालेल्या पूर्व प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राजर्षी शाहू विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे. पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रेम माधव बेराड याने, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु. शिवानी विठ्ठल राऊत या विद्यार्थिनीने पात्रता मिळवली आहे.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. एस. एम. मांटे, संस्थेच्या अध्यक्ष रेवतीताई मांटे, प्राचार्य डॉ. आर. आर. डोईफोडे, मुख्याध्यापक विलास लोखंडे, उपमुख्याध्यापक विवेक अवसरमोल, कार्यालयीन अधीक्षक किशोर वाघ, निलेश लोखंडे, ज्ञानेश्वर अल्हाट, अनिल लक्कस, विवेक पऱ्हाड, स्वप्निल वाघ, भागवत पानपाटील, गजानन लोखंडे तसेच विद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. संस्थेने आणि विद्यालयातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.