वर्षावास निमित्ताने, “जागर मातृशक्तीचा, जागर मातृसंस्काराचा प्रा. अनिल मगर यांच्या संकल्पनेचा उपक्रम
By अनिल जाधव

वर्षावास निमित्ताने, “जागर मातृशक्तीचा, जागर मातृसंस्काराचा प्रा. अनिल मगर यांच्या संकल्पनेचा उपक्रम
मौंढाळा येथे दि. 14 आक्टोबर म्हणजे “धम्म प्रवर्तन दीन” या दिवशीचे औचित्य साधुन वर्षावास समाप्ती निमित्ताने प्रा. अनिल मगर सर यांच्या संकल्पनेतून “जागर मातृशक्तीचा, जागर मातृसंस्काराचा” हा उपक्रम राबवण्यात आला, सदरील कार्यक्रमात धम्म उपासक/ उपासिका व लहान बालक बालिका यांनी पांढरेशुभ्र वस्त्र धारण करून तथागता चरणी पंचशील ग्रहण केले. व त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून धम्मऱ्यालीला सुरूवात करण्यात आली. धम्म ऱ्यालीत भंते यांची उपस्थिती होती. पुर्ण गावात पुष्प उधळत सुरूवात करण्यात आली.व धम्म ऱ्यालीत मुख्य आकर्षण, प्रत्येक उपासिका यांच्या हातात पुस्तक व मेणबत्ती, आणि बालकांच्या हातात सुध्दा महापुरुषांचे फोटो होते. आणि त्यासोबतच धम्मरथ होता. सदरील धम्म ऱ्यालीत बुध्दंग सरणम गच्छामी या सुरांनी सर्व परीसर शांतमय होउन प्रफुल्लित झाला होता. प्रा. मगर सर यांनी मौंढाळा येथे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महीण्याच्या वर्षावास काळात डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “बुद्ध आणि त्याचा धम्म” या पवित्र ग्रंथांचे वाचन मौंढाळा येथील धम्म बांधवांसमवेत बुद्ध विहारात पुर्ण केले.
त्या वर्षावास कार्यक्रम आयोजन करण्यात आले असता सदरिल कार्यक्रमासाठी परीसरातील बुलढाणा, म्हसला, तराडखेड, जामठी, चापनेर,कोसगाव, अ. सावंगी, पिंपळगाव रेणुकाई येथील धम्म उपासक/ उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. विषेश उपस्थिती धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप भोस, मौंढाळा व बोधेगाव येथील पोलीस पाटील हे सुद्धा उपस्थित होते. ठाणेदार प्रताप भोस, प्रा. प्रकाश बोर्डे, प्रा. प्रविण लोखंडे, प्रा. अनिल मगर, पत्रकार अनिल जाधव या सर्वांनी बुद्ध धम्मा विषयी सखोल मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमासाठी सर्वच मौंढाळा येथील धम्म उपासक/ उपासिका यांनी परिश्रम केले. आणि शेवटी भोजन दानाने कार्यक्रमाची सांगता झाली.