Jalna: गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; एका अल्पवयीनाचाही समावेश
By तेजराव दांडगे

Jalna: गावठी पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक; एका अल्पवयीनाचाही समावेश
जालना, दि. 20: गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीतांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल आणि ४० हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त केला आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. १९ एप्रिल २०२५ रोजी पथक गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत असताना, यश बाबासाहेब भोई (रा. काजळा, ता. जि. जालना) हा इंडेवाडी परिसरात मिळून आला. पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ ४० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल आढळून आले. तपासादरम्यान, यश भोई याने हे पिस्तूल त्याचा मित्र शिवम कैलास जाधव (वय २२, राहणार नरेश कॉम्प्लेक्स, अंबड रोड, जालना) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला प्रत्येकी ४० हजार रुपयांना विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी शिवम जाधव आणि त्या अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुब नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, पोलीस उपनिरीक्षक सपोनि राजेंद्र वाघ व सोबत पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, गोपाळ गोशिक, रमेश राठोड, सागर उबाळे, पोउपनि राजेंद्र वाघ व सोबत पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, गोपाळ गोशिक, रमेश राठोड, सागर उबाळे, इरशाद पटेल, रमेश काळे यांनी केली. याप्रकरणी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.