मोटारसायकल चोराला दणका: जालना पोलिसांकडून १५ दुचाकी जप्त, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत!
By तेजराव दांडगे

मोटारसायकल चोराला दणका: जालना पोलिसांकडून १५ दुचाकी जप्त, लाखोंचा मुद्देमाल हस्तगत!
जालना, ११ जून २०२५, बुधवार: जिल्ह्यात मोटारसायकल चोरीचे वाढते गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला (L.C.B.) विशेष सूचना दिल्या होत्या. या सूचनांनुसार, पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत, एका सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ३,६७,०००/- रुपये किमतीच्या १५ वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
अशी झाली कारवाई:
दिनांक १० जून २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांबाबत माहिती गोळा करत होते. त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कृष्णा जालिंदर सोमवारे, रा. धनगरगल्ली, घनसावंगी हा रेकॉर्डवरील आरोपीत मोटारसायकल चोरत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
माहिती मिळताच, पथकाने तत्काळ कृष्णा जालिंदर सोमवारे याचा शोध घेऊन त्याला घनसावंगी येथून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने जालना शहरातील विविध भागांतून, तसेच मंठा येथील आठवडा बाजार, अंबड आठवडी बाजार, मत्सोदरी मंदिर परिसर, घाटी दवाखाना आणि एम.आय.डी.सी. परिसर छत्रपती संभाजीनगर, तसेच नाथ मंदिर पैठण येथून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.
जप्त केलेल्या मोटारसायकली आणि उघडकीस आलेले गुन्हे:
आरोपीकडून जप्त केलेल्या १५ मोटारसायकलींमध्ये जालना जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागांत दाखल असलेले अनेक मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त केलेल्या मोटारसायकलींमध्ये शाईन, डिलक्स, स्पेलेंडर प्लस, स्पेलेंडर प्रो, बजाज CT 100 आणि बजाज कावासाकी यांसारख्या विविध कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश आहे.
एकूण ३,६७,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील तपासासाठी आरोपीला कदिम जालना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
या कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल (भापोसे) आणि अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज जाधव, स्थागुशा जालना, सहा.पो.निरी. योगेश उबाळे, पोउपनि. राजेंद्र वाघ, तसेच ASI/रामप्रसाद पव्हरे, पोहवा प्रभाकर वाघ, लक्ष्मीकांत आडेप, गोपाल गोशिक, प्रशांत लोखंडे, संदीप चिंचोले, जगदीश बावणे, कैलास खार्डे, विजय डिक्कर, रुस्तुम जैवाळ, सागर बाविस्कर, संभाजी तनपुरे, देविदास भोजने, सतीश श्रीवास, अक्रूर धांडगे, कैलास चेके, धीरज भोसले, भागवत खरात, योगेश सहाने, सोपान क्षीरसागर, रमेश काळे, किशोर पुंगळे या सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना येथील पथकाने केली.
या कारवाईमुळे मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यास मदत होणार असून, जालना जिल्ह्यातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागेल.