महिलांच्या पर्समधून 01 लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या चोरांना मौजेपुरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By तेजराव दांडगे

महिलांच्या पर्समधून 01 लाख 40 हजार रुपयांचे दागिने चोरणाऱ्या चोरांना मौजेपुरी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
जालना, दि. 14: पोलिस ठाणे मौजेपुरी जि. जालना येथे फिर्यादी नामा द्रष्टा सर्जेराव मापारे रा.साताना ता.परतुर जि. जालना ह.मु.जालना यांनी तक्रार दिली की, फिर्यादी हे दिनांक 11.04.2025 रोजी 18.40 वाजता सुमारास मुळगाव साताने येथून येत असताना त्यांना भूक लागली म्हणून ते व त्यांची पत्नी हे विरगाव येथील साईराज स्वीट मार्ट येथे नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करत असताना त्यांच्या पत्नीने हातातील पर्स ही टेबलवर ठेवली व नाश्ता करून निघून गेले. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांच्या पत्नीला लक्षात आले की, त्यांची पर्स ही विरगाव येथील साईराज स्वीट मार्ट दुकानात विसरून राहिली आहे. तेव्हा फिर्यादी व त्यांची पत्नी हे परत सदर दुकानात आले. तेव्हा त्यांना त्यांची पर्स मिळून आली. परंतु सदर पर्स मध्ये ठेवलेले 01 लाख 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे फुल व झुंबर तसेच एक तोळे वजनाची सोन्याची पोत दिसून आली नाही. त्यावरून पोलिस ठाणे मौजेपुरी जि. जालना येथे फिर्यादी यांच्या फिर्यादीवरून कलम 303 भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक, जालना, अपर पोलिस अधीक्षक, जालना यांनी गुन्हे उघडकीस आणणे बाबत वरिष्ठ स्तरावरून दिलेल्या सूचना प्रमाणे तात्काळ गुन्ह्याचे घटनास्थळ गाठून पाहणी केली. याच दरम्यान गोपनीय बातमीदारा मार्फत मिळालेल्या बातमी आधारे आरोपीत नामे 1) सुरेश नामदेव पवार रा. कोळी बोरी ता. जि. परतुर जि.परभणी 2) अजय रमेश राठोड रा. विरगाव तांडा ता. जि. जालना यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. अटक केलेल्या आरोपीतांच्या ताब्यातून चोरी गेलेला 01 लाख 40 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे.
सदरची कामगिरी अजयकुमार बन्सल पोलिस अधीक्षक, जालना, आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक, जालना, दादासाहेब चोरगे, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग परतूर यांच्या मार्गदर्शनाखाली मिथुन घुगे, सहा. पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी पो.स्टे. मौजेपुरी, पोउपनि विजय तडवी, सपोफौ/चंद्रकांत पवार, पोकॉ/प्रदिप पाचरणे, अविनाश माटे, पोकॉ/दिलीप बोर्डे, भास्कर वाघ, दादासाहेब हरणे, भगवान खरात, प्रशांत म्हस्के व होमगार्ड अंकुश घाटे यांनी केली आहे.