मोठी कारवाई! सेवली पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघड; ₹१०.५० लाखांचे दागिने जप्त
By तेजराव दांडगे

मोठी कारवाई! सेवली पोलिसांकडून जबरी चोरीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघड; ₹१०.५० लाखांचे दागिने जप्त
सेवली, दि. १५ डिसेंबर २०२५ – जालना जिल्हा पोलीस दलाच्या सेवली पोलीस ठाण्याने (Sewali Police Station) एक मोठी कामगिरी करत, नेर-पाहेगाव रस्त्यावर झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा अवघ्या १२ तासांत लावला आहे. पोलिसांनी दोन आरोपीतांना ताब्यात घेतले असून, चोरीस गेलेला ₹१०,५०,०००/- (दहा लाख पन्नास हजार रुपये) किमतीचा सोन्या-चांदीचा संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात यश मिळवले आहे.
नेमकी घटना काय?
दिनांक १४/१२/२०२५ रोजी दुपारी १२.०० वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी संतोष बळीराम बोंद्रे (रा. नेर, ता. जि. जालना) हे मोटरसायकलवरून नेर येथून पाथरूड येथील त्यांच्या सोन्याच्या दुकानाकडे जात होते. नेर ते पाहेगाव रस्त्यावरील पोखरी पाटीजवळ, अज्ञात आरोपीतांनी मागून येऊन त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली, ज्यामुळे ते खाली पडले.
यावेळी, आरोपीतांपैकी एकाने चाकूसारख्या हत्याराने दुखापत करण्याची धमकी देऊन फिर्यादीकडील हिरव्या रंगाची बॅग हिसकावली. या बॅगेत ₹१०,५०,०००/- किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने होते. या घटनेप्रकरणी सेवली पोलीस ठाणे येथे तत्काळ गु.र.नं. १६२/२०२५ भा.दं.वि. कलम ३९४, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांची तत्काळ शोधमोहीम आणि यश
गुन्हा दाखल होताच, अजयकुमार बन्सल (पोलीस अधीक्षक, जालना) आणि आयुष नोपाणी (अपर पोलीस अधीक्षक, जालना) यांच्या मार्गदर्शनाखाली सेवली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली.
उप-विभागीय पोलीस अधिकारी, परतूर उप-विभाग, आर. टी. रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवली पोलिसांनी तपास सुरू केला आणि अवघ्या १२ तासांत दोन आरोपीतांना शोधून काढले.
ताब्यात घेण्यात आलेले आरोपीत:
१. अमोल इंदल राठोड (वय ३५ वर्षे, रा. उखळी, ता. जि. जालना)
२. प्रवीण विनायक जाधव (वय २२ वर्षे, रा. राजेगाव, ता. माजलगाव, जि. बीड, ह. मु. उखळी, ता. जि. जालना)
या आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेला ₹१०,५०,०००/- किमतीचा संपूर्ण सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी योगेश खटकळ (सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी, सेवली), पो. उपनि. सलीम शेख, पो. ह. /३१० सुभाष राठोड, पो. ना./२६० पाईकराव, प्रल्हाद चिरफरे, संजय उघडे, विजय जुमडे, पांडुरंग लिंबाळकर, अशोक दुभळकर (सर्व नेम. सेवली पोलीस ठाणे), तसेच ३४६/खरात, ४२० पाचरणे (नेम. मौजपुरी पोलीस ठाणे) यांनी संयुक्तरीत्या केली आहे.
सेवली पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.



